जगासाठी भारतात तयार झालेली किया मोटर्स

तेजश्री कुंभार
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

या विभागात पहिल्यांदाच देण्यात आलेल्या वैशिष्ट्यांमुळे या गाडीने नवे मापदंड स्थापित केले आहेत

पणजी, 

किया मोटर्स कॉर्पोरेशन या जगातील सर्वात मोठ्या ऑटोउत्पादक कंपनीने आज डिजिटल सादरीकरणाच्या माध्यमातून जगभरासमोर नवी किया सोनेट सादर केली. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील कियाच्या अत्याधुनिक निर्मिती केंद्रात तयार करण्यात आलेली सोनेट ही कियाची संपूर्णपणे नवी स्मार्ट शहरी कॉम्पॅक् एसयूव्ही आहे. सेल्टोज या भारतात बनलेल्या जागतिक उत्पादनानंतर या ब्रँडची ही पुढील निर्मिती आहे. नव्या सोनेटमुळे वेगाने वाढणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागातील किया मोटर्सच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे आणि या विभागात पहिल्यांदाच देण्यात आलेल्या वैशिष्ट्यांमुळे या गाडीने नवे मापदंड स्थापित केले आहेत.
फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये सोनेटची संकल्पना जागतिक स्तरावर सादर करण्यात आली होती. त्यानंतर आता निर्मितीसज्ज मॉडेलचा वर्ल्ड प्रीमिअर करण्यात आला. भारतात लवकरच या नव्या गाडीच्या विक्रीला सुरुवात होईल आणि त्यानंतर कियाच्या अनेक जागतिक बाजारपेठांमध्ये विक्री केली जाईल. अनोखे डिझाइन आणि जागतिक दर्जा यासोबतच ;द पॉवर टू सरप्राइज  म्हणजे आश्चर्याचा सुखद धक्का
देणाऱ्या उत्पादनांमुळे किया मोटर्स जगभरात ख्यातनाम आहे. नव्याकोऱ्या सोनेटमधील सर्व काही अस्सल किया आहे आणि यामुळे चालक आणि प्रवासी सगळ्यांनाच आनंद मिळेल, हे नक्की असे किया मोटर्सकॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हो संग साँग म्हणाले. ठळक आणि आधुनिक डिझाइनची परिभाषा, चालवण्यात गंमत वाटावी असे डायनॅमिक्स आणि कियाची अत्याधुनिक उच्च तांत्रिक वैशिष्ट्ये यामुळे कियाला प्राधान्यक्रमाचा, विशेषत: मिलेनिअल्स आणि जेन झेड ग्राहकांचा प्राधान्यक्रमाचा ब्रँड बनवण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षांना प्रत्यक्ष रूप मिळाले आहे. भारत आणि त्याबाहेरील बाजारपेठांमध्ये वेगाने वाढत असलेल्या एसयूव्हीच्या बाजारपेठेतील गरजा सोनेट पूर्ण करेल आणि प्रचंड संख्येने ग्राहकांना किया ब्रँडकडे आकर्षित करून घेईल.
जगासाठी भारतात तयार केलेली सोनेट सादर करताना आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. सेल्टोज आणि कार्निवलच्या यशानंतर आम्हाला विश्वास आहे की सोनेटच्या साह्याने ग्राहकांच्या आजवर दुर्लक्षित राहिलेल्या गरजा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करत किया आणखी एका बाजारपेठ विभागात क्रांती आणेल, असे किया मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोक्युन शिम म्हणाले. किया सोनेटची रचनाच या विभागातील सर्वोत्कृष्ट दर्जा, डिझाइन, तंत्रज्ञान, सुविधा आणि चालवण्याचा उत्कृष्ट अनुभव देऊन संपूर्ण विभागातील ग्राहकांना व्यापक संख्येने आकर्षित करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.
अत्याधुनिक अनंतपूर कारखान्यात कियाचे आकर्षक जागतिक मापदंड पाळत सोनेटची निर्मिती केली जाईल आणि या ब्रँडचे उत्साही चाहते तसेच नवे ग्राहक अशा सगळ्यांकडून या गाडीचे उत्साहाने स्वागत होईल, असा
आम्हाला विश्वास आहे.

संबंधित बातम्या