जगातील भयानक 'रक्तरंजित युद्ध' अनेकांच्या मृत्यूनंतर संपले

जूनच्या अखेरीस अमेरिकेने (America) जपानवर हल्ला करण्यासाठी ओकिनावा बेटावर कब्जा केला होता.
जगातील भयानक 'रक्तरंजित युद्ध' अनेकांच्या मृत्यूनंतर संपले
World War IIDainik Gomantak

दुसऱ्या महायुध्दावेळी (World War II) जग दोन गटामध्ये विभागले होते. एक गट अमेरिका (America), फ्रान्स, ब्रिटन या देशांचा होता तर दुसरा गट हा जपान (Japan), जर्मनी या देशांचा होता. दरम्यान या युध्दात मोठ्याप्रमाणात विनाश झाला. या युद्धात जगाने अणुबॉम्बची शक्तीही पाहिली. आणि मोठ्या विध्वंसानंतर ही भयंकर लढाई संपली होती. 2 सप्टेंबर 1945 रोजी जपानने अधिकृतपणे मित्र राष्ट्रांना शरण गेले आणि युद्ध संपले. शरणागतीपूर्वीच जपानमधील (Japan) परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. जपानी नौदल आणि हवाई दले नष्ट झाली होती. जपानमधील दोन मोठ्या शहरांवर मित्र राष्ट्रांनी टाकलेल्या बॉम्बस्फोटाने देशातील पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्था पूर्णत:हा नष्ट झाली होती. खरं तर, जूनच्या अखेरीस अमेरिकेने जपानवर हल्ला करण्यासाठी ओकिनावा (Okinawa) बेटावर कब्जा केला होता.

World War II
सरेंडर करो या मारे जाओ’! तालिबान्यांची परदेशी सैन्यांना मदत करणाऱ्या लोकांना नोटीस

अमेरिकन जनरल डग्लस मॅकआर्थर (General Douglas MacArthur) यांना या हल्ल्याचे नेतृत्व देण्यात आले होतो. आणि त्यास 'ऑपरेशन ऑलिम्पिक' (Operation Olympic) असे नाव देण्यात आले, जे नोव्हेंबर 1945 मध्ये केले जाणार होते. जपानवर मोठा हल्ला करण्याची योजना अमेरिकेची होती. परंतु जेव्हा अमेरिकेने अणुबॉम्ब तयार केला, तेव्हा त्यासंबंधीची योजना बदलण्यात आली होती. मित्र राष्ट्रांनी जपानी सैन्याला बिनशर्त आत्मसमर्पण करण्यास सांगितले. त्याच वेळी, जपानचे पंतप्रधान कांतारो सुझुकी यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांचे सरकार मित्र राष्ट्रांच्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रूमॅन यांनी हिरोशिमावर अणुहल्ल्या करण्याचा आदेश दिला आणि 6 ऑगस्ट रोजी बॉम्ब टाकण्यात आला.

नागासागी शहरावर अणुबॉम्ब टाकला

हिरोशिमावरील हल्ल्यानंतर जपानच्या सुप्रीम वॉर कौन्सिलने शरणागतीला पाठिंबा दिला, परंतु त्यांच्या सदस्यांनी तसे करण्यास नकार दिला होता. त्याच वेळी, 8 ऑगस्ट रोजी सोव्हिएत युनियनने हल्ला केल्यावर जपानमधील परिस्थिती बिघडली आणि त्याविरुद्ध युद्ध घोषित करण्यात आले. त्याचवेळी अमेरिकेने नागासाकी शहरावर दुसरा अणुबॉम्बही टाकला. यानंतर, जपानी सम्राट हिरोहितोने सर्वोच्च युद्ध परिषदेची बैठक बोलावली. या बैठकीत पंतप्रधानांनी सादर केलेल्या आत्मसमर्पणाच्या प्रस्तावाला त्यांनी आपला पाठिंबा दिला. 10 ऑगस्ट रोजी हा संदेश अमेरिकेला देण्यात आला.

World War II
पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये घेणार तालिबान्यांची मदत

दोन कोटींपेक्षा जास्त सैनिक मरण पावले

दरम्यान, अध्यक्ष ट्रूमॅन यांनी मॅकआर्थरला जपानवर ताबा मिळविण्यासाठी टोकियोला पाठवले होते. ट्रूमॅनने जपानच्या अधिकृत शरणागतीसाठी यूएसएस मिसौरी युद्धनौकेची निवड केली होती. यानंतर, 2 सप्टेंबर रोजी युएसएस मिसौरीसह मित्र राष्ट्रांच्या 250 युद्धनौका टोकियोच्या आखातात नांगरल्या. सकाळी 9 वाजेपूर्वी जपान सरकारच्या वतीने परराष्ट्र मंत्री मामोरु शिगेमित्सू यांनी स्वाक्षरी केली. जनरल योशिजीरो उमेझू यांनी जपानी सशस्त्र दलांसाठी स्वाक्षरी केली. शेवटी, कमांडर मॅकआर्थरने युद्ध संपवणाऱ्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आणि अखेर दुसरे महायुद्ध संपले. दुसऱ्या महायुद्धात 20 दशलक्षाहून अधिक सैनिक आणि 40 दशलक्षाहून अधिक नागरिक मारले गेले. हे जगातील सर्वात धोकादायक युद्ध मानले जाते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com