World Wetlands Day 2021: जागतिक स्तरावर साजरा केला जातो पानथळ दिवस

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिवस म्हणुन घोषीत करण्यात आला होता. जैविक दृष्ट्या पाणथळ प्रदेश खुप महत्वाचा असून पाणथळ प्रदेशात औषधी वनस्पती आढळुन येतात. महाराष्ट्रात एकही पाणथळ प्रदेश नाही.​

World Wetlands Day: इराण मध्ये 2 फेुब्रुवारी 1971 साली रामसर येथे पाणथळ प्रदेशाचे  संवर्धन करण्यासाठी एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेमध्ये 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिवस म्हणुन घोषीत करण्यात आला होता. जैविक दृष्ट्या पाणथळ प्रदेश खुप महत्वाचा असून पाणथळ प्रदेशात औषधी वनस्पती आढळुन येतात. महाराष्ट्रात एकही पाणथळ प्रदेश नाही.

रामसर या शहरात जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव अंमलात आला तेव्हापासून संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांपैकी सुमारे 90 देशांनी हा ठराव स्विकारला आहे. भारताने हा करार 01 फेबुरवरी 1982 रोजी स्विकारला आहे. 

पाणथळ प्रदेश दुष्काळात भूजलाचा एक उत्तम स्रोत असतात, पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाणी शोषून घेतात. अतिवृष्टी झाल्यास पाणथळ जमिन जास्तीच पाणी शोषुन घेते. त्यामुळे पाणथळ जमीनीचे संरक्षण आणि संर्वधन करणे गरजेचे आहे. पाणथळ प्रदेशामुळे जमिनीची धुप होण्यापासुन बचाव होतो.

पानथळ जमिनीत गवताळ जागा, खाजण जमिनी, नद्या, खाड्या, डबकी या सर्वांचा समावेश होतो. त्याच्या आधारावर एक परिसंस्था तयार झालेली असते. त्यात पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, मोठी श्वापदे यांचा सामावेश असतो.अनेक स्थलांतरित पक्ष्यांसाठी ते महत्त्वाचे स्थान असते.

जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करत असतांना दरवर्षी एक थीम निवडली जाते.  या वर्षी देखील एक थीम निवडण्यात आली आहे. Wetlands and Water अशी या वर्षीच्या या दिवसाची थीम आहे  जगभरात आजच्या दिवशी अलेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. आजच्या पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर पाणथळ जमिनींचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित बातम्या