जगातील सर्वात व्यस्त सुएझ कालव्यात मोठी वाहतूक कोंडी; जाणून घ्या नेमके प्रकरण  

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 25 मार्च 2021

जगातील सर्वात व्यस्त शिपिंग चॅनेलपैकी एक असणाऱ्या आणि धान्य, तेल व इतर व्यापारासाठी आशिया आणि युरोपला जोडणारा सुवेझ कालवा सध्या ठप्प झाल्याची माहिती मिळाली आहे.

जगातील सर्वात व्यस्त शिपिंग चॅनेलपैकी एक असणाऱ्या आणि धान्य, तेल व इतर व्यापारासाठी आशिया आणि युरोपला जोडणारा सुवेझ कालवा सध्या ठप्प झाल्याची माहिती मिळाली आहे. सुएझ कालवा प्राधिकरणाने (एससीए) याबाबत माहिती देताना, मंगळवारी सकाळी जोरदार वारे आणि धुळीच्या वादळामुळे एक जहाज कालव्याच्या एकल-लेन दक्षिणेकडील भागामध्ये तिरपे झाल्याचे सांगितले. तसेच आठ टग्स हे जहाज हलविण्याचे काम करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. तर अडकलेले हे जहाज जवळ-जवळ 400 मीटर इतके मोठे असल्याचे समजते. (The worlds busiest Suez Canal ship capsized causing a major traffic jam)

त्यानंतर, जहाज हलवण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या डच कंपनी बोस्कलिसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर बर्डोव्हस्की यांनी एका माध्यमाशी बोलताना, परिस्थितीनुसार यासाठी किती वेळ लागेल हे सांगू शकत नसल्याचे म्हटले आहे. तर मोठ्या कंटेनरसह अनेक जहाज, तेल आणि वायूने भरलेले टँकर व इतर साधनांची ने-आण करणाऱ्या जहाजांच्या रांगा कालव्याच्या दोन्ही बाजुंना लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शिवाय मागील काही वर्षातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी याठिकाणी झाली आहे. 

हॉंगकॉंगकडून फायझर लसीच्या वापरावर स्थगिती

सुएझ कालवा (Suez Canal) प्राधिकरणाने वाहुतुक थोड्या प्रमाणात का होईना सुरु होण्याच्या आशेवर काही जहाजांना कालव्यात प्रवेश दिला होता. मात्र यात कोणतेच यश आले नसल्यमुळे आज पुन्हा वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती दिली. तर, येत्या काही दिवसांत हा अडथळा दूर न झाल्यास काही शिपिंग कंपन्या आफ्रिकेच्या दक्षिणेकडील टोकावरून वाहतूक करू शकतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पण यासाठी अतिरिक्त वेळ लागणार असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. 

दरम्यान, जगातील अंदाजे 30 टक्के शिपिंग कंटेनर हे 193 किमी लांबीच्या सुएझ कालव्यातून प्रवास करतात. आणि सर्व वस्तूंच्या जागतिक व्यापाराच्या सुमारे 12 टक्के व्यापार हा याच मार्गातून होतो. त्यामुळे हा अडथळा दूर न झाल्यास त्याचा फटका माल वाहतुकीवर होणार हे मात्र निश्चित.        

संबंधित बातम्या