Powerful Passports: 'या' देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली,वाचा एका क्लिकवर

कोण्याही देशात जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्टची गरज असते.
World Most Powerful Passports
World Most Powerful PassportsDainik Gomantak

दरवर्षी पासपोर्ट रँकिंग जारी केले जाते. या रँकिंगच्या आधारे (Passport Ranking) कोणत्या देशाचा पासपोर्ट किती शक्तिशाली आहे हे कळते. जर आपण या वर्षातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टबद्दल बोललो तर तो जपानचा पासपोर्ट आहे. कारण 2023 साठी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर झाली आहे.

लंडनस्थित जागतिक नागरिकत्व आणि निवासी सल्लागार फर्म हेनली अँड पार्टनर्सने प्रसिद्ध केलेल्या नवीन अहवालानुसार आशियातील तीन देशांतील तीन पासपोर्ट त्यांच्या धारकांना इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक जागतिक प्रवास स्वातंत्र्य देतात.

  • हा देश दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे

सीएनएनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जपानी (Japan) नागरिक जगभरातील विक्रमी 193 गंतव्यस्थान/देशांमध्ये व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा-ऑन-डिमांड प्रवेशाचा आनंद घेतात. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत जपानने सिंगापूर (Singapore) आणि दक्षिण कोरियाला मागे टाकले आहे.

कारण या देशांतील नागरिकांना 192 देशांमध्ये मोफत व्हिसा प्रवेश मिळू शकतो. हेन्ली अँड पार्टनर्सच्या अभ्यासानुसार, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट जपानकडे आहे. जपानी पासपोर्ट जगभरातील 193 देशांमध्ये व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल प्रवेश प्रदान करतो.

World Most Powerful Passports
Pakistan Former Army Chief: इमरान खान यांना अंधारात ठेवून बाजवांची मोठी राजकीय खेळी, थेट होते दिल्लीच्या संपर्कात
  • टॉप चार्टमध्ये युरोपचा जलवा

आशियाई देशांच्या या त्रिकुटानंतर युरोपियन देशांची भरमार लीडरबोर्डच्या टॉप 10 चार्टमध्ये ठामपणे बसली आहे. जर्मनी आणि स्पेन संयुक्त तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

ज्यांचे नागरिक कोणत्याही समस्येशिवाय 190 देशांमध्ये फिरू शकतात. चौथ्या क्रमांकावर फिनलंड, इटली, लक्झेंबर्ग आहेत ज्यांच्या नागरिकांना 189 देशांमध्ये व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा आहे. यानंतर ऑस्ट्रिया, डेन्मार्क, नेदरलँड आणि स्वीडन हे चार देश पाचव्या तर फ्रान्स, आयर्लंड, पोर्तुगाल आणि युनायटेड किंग्डम सहाव्या क्रमांकावर आहेत.

यानंतर बेल्जियम, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि चेक रिपब्लिकसह न्यूझीलंड आणि अमेरिका 7 व्या क्रमांकावर आहेत. आणि अफगाणिस्तान शेवटच्या स्थानावर आहे. एकूण 27 देश अफगाणिस्तानमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com