होय, ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत माझे शरीरसंबंध होते!

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

जेनिफर अर्करीने ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याबरोबर आपले शरीरसंबंध होते असा गौफ्यस्फोट एका मुलाखतीत केला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यावर अमेरिकेतील एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेतील उद्योजिका असणाऱ्या जेनिफर अर्करीने ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याबरोबर आपले शरीरसंबंध होते असा गौफ्यस्फोट एका मुलाखतीत केला आहे. त्यानंतर या संदर्भात बोरीस जॉन्सन यांच्याविरोधात चौकशी सुरु झाली आहे. जेनिफर यांनी दिलेल्या माहीतीनुसार जॉन्सन आणि त्यांचं नात 2012 ते 2016 असं चार वर्ष होतं. या कालावधीमध्ये बोरीस जॉन्सन हे लंडनचे महापौर होते. त्यांनी आपली आधीची पत्नी मरीना व्हीलर यांच्याबरोबर पुन्हा विवाह केला होता.

जेनिफर यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्य़े त्यांनी, आपण ज्या बोरीस जॉन्सन यांना ओळखतो त्यांचे अस्तित्व आताच्या पंतप्रधानांमध्ये दिसून येत नसल्याचे म्हटले आहे. 2019 मध्ये प्रथम जेनिफर आणि बोरीस जॉन्सन यांच्या नात्यांविषयी माहिती समोर आली होती. तेव्हा बोरीस यांनी आपल्याला मदत करण्यास नकार दिला असल्याचा दावाही जेनिफर यांनी केला आहे. 2011 मध्ये पहिल्यांदा आमच्या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी महापौर पदाच्या पोटनिवडणुकींच्या प्रचारमध्ये आपण बोरीस यांच्याबरोबर स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं असही जेनिफर यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. तसेच लंडनमधील जेनिफर यांच्या राहत्या घरीच पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवले होते असा दावा देखील जेनिफर यांनी केला आहे. इतकेच नाही तर, आपण दोघेही एकमेकांकडे शारिरीक आणि मानसिकरित्या आकृष्ठ झालो होतो, असही जेनिफर यांनी म्हटलं आहे. (Yes I had sex with the Prime Minister of Britain)

हॉंगकॉंगवरील पकड मजबूत करण्यासाठी 'ड्रॅगन'कडून नवे कारस्थान 

याव्यतिरिक्त, बोरीस जॉन्सन यांनी लंडनमधील एका रेस्टारंटमध्ये प्रपोज केलं होत असंही जेनिफर यांनी म्हटलं आहे. याशिवाय, मला तुझ्याबरोबर डेट करायचं आहे असं देखील बोरीस जॉन्सन यांनी मला सांगितलं होतं. 2012 मध्ये पॅरा ऑलम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या काही वेळ आधीच आपण आणि बोरीस यांनी शेरोडिच येथे पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्याचा खुलासा जेनिफर यांनी या मुलाखतीत केला आहे. तसेच, आपण अनेकवेळा एकाच खोलीत राहिलो असल्याचे देखील जेनिफर यांनी सांगितलं आहे. जेनिफर ही बोरीस जॉन्सन यांच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान आहे. 

संबंधित बातम्या