ऑस्ट्रेलियातील 'या' महागड्या शेळीची किंमत ऐकूण तुम्ही व्हाल थक्क !

ऑस्ट्रेलियामध्ये (Australia), मराकेश (Marrakesh) नावाची शेळी $21,000 (रु. 15.6 लाख) मध्ये विकली गेली आहे.
ऑस्ट्रेलियातील 'या' महागड्या शेळीची किंमत ऐकूण तुम्ही व्हाल थक्क !
MarrakeshDainik Gomantak

ऑस्ट्रेलियामध्ये (Australia), मराकेश (Marrakesh) नावाची शेळी $21,000 (रु. 15.6 लाख) मध्ये विकली गेली आहे. विशेष म्हणजे या शेळीने मागील सर्व विक्रम मोडले आहेत. यामुळेच ही शेळी चर्चेत आली आहे. बुधवारी, पश्चिम न्यू साउथ वेल्समधील (New South Wales) कोबर (Cobar) या गावात बकरे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. गार्डियनच्या रिपोर्टनुसार, ही शेळी विकत घेणार्‍या अँड्र्यू मॉस्लेने सांगितले की, ही एक अतिशय स्टायलिश शेळी आहे.

दरम्यान, याआधी सर्वात महागड्या बकरीचा विक्रम $12,000 होता. गेल्या महिन्यात ब्रॉक नावाची शेळी विकली गेली, जिने हा विक्रम केला होता. मराकेशच्या आधी, मॉस्ले यांच्याकडे ऑस्ट्रेलियातील सर्वात जास्त किमतीची शेळी होती. त्याने गेल्या वर्षी आणखी एका शेळीसाठी $9,000 दिले होते. एबीसी न्यूजनुसार, मोसेले कोकरे, गुरे तसेच शेळ्या पाळतात आणि आपल्या कळपाला जंगली शेळ्यांपासून सुरक्षित ठेवण्यावरही मोेठी गुंतवणूक करतात. मॉस्ले यांनी पुढे म्हणाले की, मराकेशसारख्या शेळ्या महाग आहेत.

Marrakesh
अवघ्या 24 तासात स्वीडनच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचा राजीनामा

फक्त 17 शेळ्या आहेत

याशिवाय, शेळीच्या मांसाची मागणी पूर्ण करण्यासाठी परिसरातील शेतकरीही स्वत:च्या चांगल्या प्रतीच्या जनावरांच्या संगोपनावर अवलंबून आहेत, हेही मोस्ले यांनी अधोरेखित केले. क्वीन्सलँड (Queensland) सीमेजवळील गुडुगा येथील रंगलँड रेड स्टड येथे मराकेशचे संगोपन झाले. कोबर विक्री दरम्यान, या जातीच्या शेळ्यांची संख्या 17 होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com