तालिबान सरकारला लवकरच मान्यता, प्रवक्त्याचा मोठा दावा

अफगाणिस्तानचे उप माहिती आणि संस्कृती मंत्री आणि तालिबानचे (Taliban) प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद (Zabiullah Mujahid) यांनी दावा केला आहे
तालिबान सरकारला लवकरच मान्यता, प्रवक्त्याचा मोठा दावा
Zabiullah Mujahid: world will soon recognize the Taliban governmentDainik Gomantak

अफगाणिस्तानचे (Afghanistan) उप माहिती आणि संस्कृती मंत्री आणि तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद (Zabiullah Mujahid) यांनी दावा केला आहे की जग लवकरच तालिबान सरकराचा (Taliban Government) स्वीकार करेल. स्थानिक माध्यमांनी रविवारी ही माहिती दिली. खामा प्रेसच्या मते, उपमंत्र्यांनी सांगितले की अनेक देशांचे प्रतिनिधी अफगाणिस्तानात येऊन गेले आहेत आणि त्यांनी (Taliban) संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सरचिटणीसांना एक पत्र पाठवून तालिबान सरकारसाठी मान्यता मान्यता मागितली आहे.(Zabiullah Mujahid: world will soon recognize the Taliban government)

मुजाहिद म्हणाले की मान्यता हा त्यांचा हक्क आहे आणि तालिबान नेते संयुक्त राष्ट्रांशी सतत चर्चा करत आहेत. मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांचा आदर करणे, सर्वसमावेशक सरकार बनवणे आणि अफगाणिस्तानला दहशतवाद आणि अतिरेक्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनू न देणे हे तालिबानच्या मान्यतेसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने घातलेल्या अटी आहेत.असे देखील त्यांनी सांगितले आहे.

Zabiullah Mujahid: world will soon recognize the Taliban government
'अफगाणिस्तानच्या सद्य स्थितीला पाकिस्तानच जबाबदार': EFSAS

खामा प्रेसने पुढे असे म्हटले आहे की अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातने या सर्व अटी लागू करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु त्यापैकी एकही अद्याप अंमलात आलेली नाही. दरम्यान, रशिया, अमेरिका, जपान, कॅनडा, फ्रान्स आणि ब्रिटन या सर्वांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानने स्थापन केलेल्या सरकारला मान्यता देण्यास नकार दिला आहे.

माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सरकारच्या पडझडीनंतर देश संकटातून जात आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून एक महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. देशातून अमेरिकन आणि नाटो सैन्याच्या माघारीदरम्यान तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्ण कब्जा केला आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलमध्ये प्रवेश केला होता जेव्हा परदेशी सैन्य अजूनही परतीच्या मार्गावर होते. 31 ऑगस्टपर्यंत, अमेरिकन सैन्याने देश सोडला होता.

Related Stories

No stories found.