भारताच्या स्वदेशी लसीला परदेशात डिमांड; कोव्हॅक्सिनला मान्यता देणारा 'हा' ठरला पहिला देश

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 4 मार्च 2021

केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या 'कोव्हिशील्ड' आणि भारत बायोटेक व आयसीएमआरने बनवलेल्या 'कोव्हॅक्सीन' या लसींना मान्यता दिली होती.

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारीला सुरवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात देशातील आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्य़ा कर्मचाऱ्यांना आणि सेवकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यानंतर 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये सह आजार असलेले आणि जेष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या 'कोव्हिशील्ड' आणि भारत बायोटेक व आयसीएमआरने बनवलेल्या 'कोव्हॅक्सीन' या लसींना मान्यता दिली होती. आणि याच पार्श्वभूमीवर भारत बायोटेकने कोव्हॅक्सीन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील आकडेवारी काल जाहीर केली होती. त्यानंतर आता झिम्बाब्वे या देशाने कोव्हॅक्सीन या लसीला अधिकृत मान्यता दिली असल्याची माहिती मिळाली आहे. 

West Bengal Assembly election 2021: पश्चिम बंगालच्या वाघीणीला शिवसेनेचा पाठींबा

भारताने देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ करताना ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाने बनवलेली 'कोव्हिशील्ड' व भारत बायोटेकने निर्मिती केलेली  'कोव्हॅक्सीन' लस देण्यास सुरवात केली होती. तर भारताने जगातील इतर देशांना ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाने बनवलेली 'कोव्हिशील्ड' लस मैत्रीच्या स्वरूपात व मागणीनुसार पुरवण्यास चालू केले होते. तसेच भारत बायोटेकने बनवलेली स्वदेशी कोव्हॅक्सीन लस 81 टक्के प्रभावी असल्याचा दावा कालच कंपनीने केला होता. भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील आकडेवारी जाहीर करताना 25,800 लोकांना लसीकरणामध्ये सहभागी करुन घेण्यात आल्याची माहिती दिली होती. व त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतील झिम्बाब्वेने कोव्हॅक्सीन या लसीच्या वापरला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतात विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सीन लसीला मान्यता देणारा झिम्बाब्वे हा आफ्रिकेतील आणि जगातील पहिला देश ठरला आहे. 

'मेट्रो मॅन' ई श्रीधरन केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे...

झिम्बाब्वेने कोव्हॅक्सीन या लसीच्या वापरला अधिकृत मान्यता दिल्यानंतर झिम्बाब्वे मधील भारतीय दूतावासाने लवकरात लवकर ही लस पुरवणार असल्याचे आज म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कोव्हॅक्सीन ही लस 80.6 टक्के प्रभावी असल्याची माहिती काल भारत बायोटेक आणि आयसीएमआरने दिली होती. हैदराबादस्थित भारत बायोटेकने कोव्हॅक्सीन लसीची निर्मीती केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सीन लस घेऊन आपल्या कृतीतून एक उदाहरण प्रस्तुत केले होते. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या चेअरमन कृष्णा इला यांनी भारत बायोटेकने बनवलेली कोव्हॅक्सीन लसीचा डोस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्य़ामुळे त्यांचे आभार मानले आहेत.    

         

 

संबंधित बातम्या