गोवा अँटिबायोटीक्सची गैरहजर कामगारांना नोटीस

Dainik Gomantak
मंगळवार, 28 एप्रिल 2020

जे कर्मचारी ३० मार्चपासून गैरहजर राहिले त्या सर्व कर्मचाऱ्यांना लेखी नोटीस पाठवून कामाला हजर राहण्याची विनंती केली व गैरहजर राहण्याचे कारण लेखी स्वरूपात मागितलेले आहे.

मोरजी

तुये येथील गोवा अँटिबायोटीक्स कंपनी ३० मार्चपासून सुरू झाली आहे. १०० टक्के कामगारांना घेऊन ही औषध निर्मिती करणारी कंपनी दोन पाळीत चालते. काही चार पाच कामगार मागच्या ३० तारखेपासून कामावार आले नाहीत. त्यामुळे त्यांना कंपनीने नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.
लॉकडाऊन काळात सर्वप्रकारची वाहतूक सेवा बंद असल्यामुळे कामगारांना कामावर पोचता येत नाही. मात्र, ९९ टक्के कामगार कामाला वेळेवर आणि नियमित येतात. काही कर्मचाऱ्यांकडे वाहतुकीची सोय नसल्याने हे कामगार कामावर पोचू शकत नाहीत.
या कंपनीत चार पाच कर्मचारी हे महाराष्ट्रातील असल्याने सीमा बंद असल्याने ते कामावर येऊ शकले नाहीच. मात्र, पेडणे तालुक्यातील व इतर तालुक्यातील जे ९९ टक्के कर्मचारी आहेत ते नियमित कामाला येतात. जे कर्मचारी ३० मार्चपासून गैरहजर राहिले त्या सर्व कर्मचाऱ्यांना लेखी नोटीस पाठवून कामाला हजर राहण्याची विनंती केली व गैरहजर राहण्याचे कारण लेखी स्वरूपात मागितलेले आहे. जर कामावर गैरहजर आणि उत्तर दिले नाही, तर गैरहजर म्हणून नोंदी करण्यात येईल असे नोटिशीत म्हटले आहे.
या विषयी कामगार संघटनेचे अध्यक्ष झिलू शेट्ये यांच्याकडे संपर्क साधला असता जे गैरहजर आहेत, त्यांना नोटीस पाठवून गैरहजरीबद्दल उत्तरे देण्यासाठी सूचना केली आहे. ९९ टक्के कर्मचारी नियमित कामावर येतात, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या