हस्तक्षेप अर्जावर सुनावणी पूर्ण; गोवा खंडपीठाकडून निर्णय राखीव

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण

पणजी : मेरशी पंच प्रकाश नाईक याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या संशयित विल्सन गुदिन्हो याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यात प्रकाशची बहीण अक्षया नाईक हिने सादर केलेल्या हस्तक्षेप अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंठपीठासमोर सुनावणी होऊन निर्णय राखून ठेवला. या निर्णयानंतर गुदिन्हो याच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.

या हस्तक्षेप अर्जाला संशयित गुदिन्हो याच्या वकिलानी त्याला विरोध केला. अक्षया नाईक हिच्या हस्तक्षेप अर्जावरील सुनावणीवेळी तिच्या वकिलांनी संशयिताच्या अर्जावरील सुनावणीवेळी बाजू मांडण्यास परवानगी देण्याची विनंती केली. मृत्यूपूर्वी प्रकाश याने मोबाईल व्हटस्अपवरून पाठवेल्या मेसेजमध्ये संशयिताच्या नावाचा उल्लेख केला आहे व त्याच्या सतावणूक व ब्लॅकमेलमुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अर्जदाराला संशयिताच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीवेळी हस्तक्षेप करण्यास परवानगी द्यावी अशी बाजू मांडली.

हस्तक्षेप अर्जदाराने पोलिसांत दिलेल्या जबानीत दिलेली माहिती न पटणारी आहे. प्रकाश नाईक याने स्वतःहून डोक्यात गोळी झाडून घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्रथम अर्जदार पोहचल्या होत्या. प्रकाशचा हात रिव्हॉल्वरच्या झटक्याने मागे जायला हवा मात्र तिने दिलेल्या जबानीत प्रकाशचे हात चादरीखाली होते. रिव्हॉल्वर चादरीच्या वर छातीवर होते तर मोबाईलही पोटावर होता. त्यामुळे पोलिसांनी हे कसे काय शक्य आहे या दिशेनेही तपास करायला हवा. प्रकाशचा मृत्यू हा आत्महत्या किंवा खून यापैकी झाला आहे. त्याची तपास पोलिसांनी करून सत्य बाहेर आणण्याची गरज आहे. पोलिसांनी संशयिताच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला आहे त्यामुळे पोलिस त्यांची भूमिका बजावण्यात समर्थ आहेत. या हस्तक्षेप अर्जाला परवानगी देण्याची गरज नाही असा युक्तिवाद संशयित गुदिन्हो यांचे ज्येष्ठ वकील नितीन सरदेसाई यांनी केला.
 

 

पर्वरीत ८ रोजी माडाचे फेस्‍त

संबंधित बातम्या