महापालिका व कार्निव्हल

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

पणजी:कार्निव्हल मिरवणूक बांदोडकर मार्गावरच
महापालिकेची भूमिका; मात्र वाहतूक पोलिस खात्याचा नकार
पणजीत २२ रोजी होणारी कार्निव्हल मिरवणूक भाऊसाहेब बांदोडकर मार्गावरूनच काढण्यास पोलिसांच्या वाहतूक शाखेने परवानगी नाकारली आहे.तरीही महापालिका जुन्या मार्गावरूनच कार्निव्हल मिरवणूक काढण्यावर ठाम आहे.या निर्णयाला आमदार बाबूश मोन्सेरात हेही जुन्या मार्गावरच मिरवणूक व्हावी, यासाठी आग्रही आहेत.

शहरातील वाहतूक कोंडीला कंटाळून तीन वर्षांपूर्वी कार्निव्हल मिरवणुकीचे स्थान बदलण्यात आले.मिरामार ते दोनापावला रस्त्यावर काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमुळे शहरातील पर्यटकांना विनाकारण एवढ्या लांब जावे लागत होते.त्याशिवाय त्याचा परिणाम येथील व्यवसायावर झाला होता.पर्यटन खात्याने नुकत्याच घेतलेल्या बैठकीवेळी पणजी कार्निव्हल समितीचे चेअरमन फ्रान्सिस मार्टिन, आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी हजेरी लावली होती. त्या बैठकीत महापालिकेच्यावतीने उपस्थित सदस्यांनी बांदोडकर मार्गावर जुन्या सचिवालयापासून निघणारी पूर्वीप्रमाणेच कार्निव्हल मिरवणूक काढण्यावर आम्ही ठाम आहोत, असे सांगितले.परंतु या बैठकीत वाहतूक शाखेचे उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी पणजी न्यायालयापासून मेरी इमॅक्युलेट चर्च ते हिंदू फार्मसी आणि तेथून आझाद मैदान अशी शहरातून मिरवणूक काढावी, अशी सूचना केली.परंतु ही सूचना महापालिकेने मान्य केली नाही.
कार्निव्हल मिरवणूक पुन्हा पूर्वीच्या मार्गावर काढण्यावर महापालिका अजूनही ठाम राहिली आहे.याविषयी महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले की, पर्यटन खात्याने पूर्वीपासून १८ जून मार्गावर होणाऱ्या शिमगोत्सव मिरवणुकीला परवानगी दिली होती, त्याचप्रमाणे कार्निव्हल मिरवणुकीला परवानगी द्यावी.पणजीतील मिरवणूक पाहण्यासाठी देश-विदेशी पर्यटकांना अत्यंत सोपे जाते.मिरामारकडे मिरवणूक नेल्यामुळे त्या ठिकाणी पर्यटकांना आणि नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे बांदोडकर मार्गावरील जुन्या सचिवालयापासून कार्निव्हल मिरवणूक घेण्यासाठी आम्ही आग्रही आहोत.या मागणीला आमदार मोन्सेरात यांनीही पाठिंबा दिला आहे.

स्‍वयंअपघातात दुचाकी अपघातात दोन युवक ठार

संबंधित बातम्या