आजपासून गोव्यात कार्निव्हलची धूम

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

पणजीत आज कार्निव्हल मिरवणूक
चार दिवसांत सात ठिकाणी होणार आयोजन

पणजी : गोव्याची संस्कृती व पारंपरिक कलेचे दर्शन घडविणाऱ्या गोवा कार्निव्हल मिरवणूक धूम उद्या शनिवार २२ फेब्रुवारीपासून पणजीतून सुरू होत आहे. २२ ते २५ फेब्रुवारीपर्यंत पणजी, मडगाव, वास्को, म्हापसा, कुडचडे, मोरजी व केपे असे ७ ठिकाणी कार्निव्हल मिरवणुकीचे आयोजन होणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असलेल्या या कार्निव्हलसाठी देश - विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या कार्निव्हल महोत्सवावेळी ‘खा, प्या व मजा करा’ असा संदेश या महोत्सवातून देण्यात आला आहे.

या कार्निव्हल महोत्सवाचे किंग मोमो म्हणून व्यवसायाने वकील असलेले शॅलोम सार्दिन हे भूमिका बजावणार आहेत. या महोत्सवाच्या मिरवणुकीवेळी गोव्याची संस्कृती तसेच पारंपरिक कलेचे दर्शन घडविणाऱ्यांचा या पथकांचा समावेश असेल. या चार दिवसांच्या कार्निव्हल काळात गोव्यातील वातावरण कार्निव्हलमय होणार असल्याने गोमंतकियांना तसेच पर्यटकांना हा महोत्सव म्हणजे पर्वणीच मिळणार आहे.

सात ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्निव्हल मिरवणुकीसाठी बक्षिसे तसेच साधनसुविधेवर सुमारे १ कोटी ४७ लाख १५ हजार रुपये खर्च होणार आहे तर पणजी, मडगाव, वास्को व म्हापसा या चार शहरांमधील कार्निव्हलच्या सजावटीचे कंत्राट विनय डेकोरेटर्सला देण्यात आले असून त्यावर सुमारे १ कोटी ५२ लाख रुपये खर्च होणार आहेत. कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या या कार्निव्हल महोत्सवामधून देशी व विदेशी पर्यटकांना गोव्याच्या पर्यटनाकडे आकर्षित करण्याचा त्यामागील मुख्य उद्देश आहे. गोवा हे पर्यटकांचे नेहमीच आकर्षण ठरले आहे त्यामुळे अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करून गोव्यातील पर्यटनात वाढ करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे.

देशातील पहिल्या तरंगत्या जेटीचे लोकार्पण

कार्निव्हलचे आयोजन
२३ फेब्रुवारी - मडगाव व केपे
२४ फेब्रुवारी - वास्को व कुडचडे
२५ फेब्रुवारी - म्हापसा व मोरजी

संबंधित बातम्या