गोवा डेअरीचे दूध दर वाढले

Dainik Gomantak
बुधवार, 1 जानेवारी 2020

फोंडा

फोंडा

गोवा डेअरीच्या दूध दरात नववर्षापासून  बुधवारपासून वाढ करण्यात आली. हे वाढीव दराचे दूध मार्केटमध्ये आल्याने आधीच महागाई त्यात आता वाढीव दराचे दूध खरेदी करावे लागणार असल्याने दूध ग्राहकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गोवा डेअरीच्या स्टॅंडर्डाईज्ड दूध दरात प्रति लीटर ४ रुपये तर गाईच्या दूध दरात प्रती लिटर २ रुपये वाढ करण्यात आली आहे. गोवा डेअरीच्या अन्य प्रतीच्या दूध दरात वाढ करण्यात आलेली नाही. नवीन दराप्रमाणे स्टॅंडर्डाईज्ड दूध दर प्रती लिटर ५० रुपये तर गाईच्या दुधाला अर्ध्या लिटरला २२ रुपये ग्राहकाला मोजावे लागणार आहेत.
गोवा डेअरीने पाच महिन्यांपूर्वी दूध उत्पादकांच्या दुधाचा दर वाढवला होता. या वाढीव दराने गोवा डेअरीला रोज किमान एक लाख रुपये दूध ग्राहकांना द्यावे लागत होते. त्यामुळे साधारण एक लाख रुपये नुकसानी गोवा डेअरीला सहन करावी लागत होती. आता दोन प्रकारच्या दूध दरात वाढ केल्याने प्रती दिन साधारण सव्वा लाखावर फायदा गोवा डेअरीला होणार आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना दिलेला वाढीव दर या दूध पाकिटावरील वाढीव दरामुळे वसूल करणे शक्‍य आहे.
गोवा डेअरी व्यवस्थापनाने दुधाच्या वाढीव दराचा प्रस्ताव राज्य सरकारच्या सहकार निबंधकांना सादर केला होता. त्याला सरकारने मान्यता दिल्यानंतर हे वाढीव दराचे दूध आजपासून (बुधवारी) मार्केटमध्ये आले आहे

संबंधित बातम्या