राज्यात 26 हजार नवमतदार करणार प्रथमच मतदान

अंतिम याद्या जाहीर : विधानसभेसाठी एकूण 11 लाख 56 हजार 464 मतदार
राज्यात 26 हजार नवमतदार करणार प्रथमच मतदान

Goa Assembly Election 2022

Dainik Gomantak

पणजी: विधानसभा निवडणुका 2022 (Goa Assembly Election 2022) च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज अंतिम मतदार यादी जाहीर केली. 2017 च्या निवडणुकीपेक्षा यंदा 44 हजार 772 मतदार वाढले असून यात 26 हजार 297 नवमतदार आहेत. 2017 च्या तुलनेत प्रत्येक मतदार संघात सर्वसाधारणपणे केवळ बाराशे मतांची भर पडली आहे. वाढलेला नव मतदारांचा आकडा कुणाच्या बाजूने उभा राहणार हा महत्वाचा मुद्दा आहे कारण हे प्रथमच मतदान करणारे असल्याने मतदान करणारच आहेत त्यामुळे ते निर्णायक ठरणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Goa Assembly Election 2022</p></div>
... तर गोवा विधानसभा निवडणुका पुढे ढकला

चालू विधानसभेचा (Goa Assembly) कार्यकाळ 15 मार्चला संपत असून तत्पूर्वी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरवात केली असून प्रचाराचा धडाका लावला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने या निवडणुकीची तयारी केली असून अंतिम मतदार याद्या आज जाहीर केल्या आहेत. आता या मतदार याद्यांमध्ये केवळ 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांना आचारसंहिता जाहीर करेपर्यंत आपले नाव नोंदवता येणार आहे. अन्यथा या याद्या अंतिम ठरणार आहे. यावेळी 18 आणि 19 वर्षातील 26 हजार 297 नवमतदार असून हे विधानसभेसाठी प्रथम मतदान करणार आहेत.

निवडणूक (Goa Election) आयोगाचा दौरा पूर्ण

निवडणूक आयोगाने 2022 मध्ये होऊ घातलेल्या गोवा (Goa), पंजाब, मणिपूर, उत्तर प्रदेश, आणि उत्तराखंड राज्याचा दौरा पूर्ण केला आहे. निवडणूक तयारीची पाहणी केली आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या घोषणांची शक्यता आहे.

30 हजारांची वाढ : नवीन मतदार याद्या बनवताना नाव नोंदणी आणि नाव वगळणे याबाबत मतदारांकडून नोंदणी प्रस्ताव मागवण्यात आले होते. यानुसार 30 हजार 599 मतदार वाढले. तर 14 हजार 409 मतदार कमी झाले आहेत. कमी झालेल्या मतदारांमध्ये ७ हजार 556 मृत्यू असून 443 दुबार (रिपीट) मतदार आहेत. तर 93 बेपत्ता असून 135 अपात्र ठरले आहेत. याशिवाय 6202 इतर जागी स्थलांतर झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com