हुश्श! झाली बाबा एकदाची निवडणूक, आता प्रतिक्षा निकालाची

आता प्रतीक्षा निकालाची असून 10 मार्च पर्यंत वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत उमेदवाराबरोबर मतदार राज्यांची (Goa) मनातली हूडहूड चालू राहणार आहे.
Goa
Goa Dainik Gomantak

वास्को: गोव्यात निवडणुका (Goa Election 2022) पार पडल्यानंतर उमेदवारांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. तरी अजून कार्य संपले नसून आता प्रतीक्षा निकालाची असून 10 मार्च पर्यंत वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत उमेदवाराबरोबर मतदार राज्यांची मनातली हूडहूड चालू राहणार आहे. (After The Election Goas Leaders Appeared In Relaxed Mode)

दरम्यान, काल निवडणुक पार पडल्यानंतर आज बहुतेक उमेदवारांकडून त्यांच्या रीलेक्शसेशन मोड विषयी माहिती जाणून घेतली असता प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या याबद्दल थोडक्यात आढावा. मुरगावचे (Murgaon) मतदारसंघाचे भाजप उमेदवार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी आज आपल्या घरातच कुटुंबियांसोबत वेळ घालवला असल्याचे सांगितले. तसेच आज मंगळवार असल्याने त्यांनी घरात नित्यनियमाप्रमाणे श्री गणेश आराधना पाठ पठण केले असल्याचे त्यांनी सांगितले. श्री गणेशाचे निस्सीम भक्त असलेले मिलिंद नाईक यांनी निवडणूक झाली तरी आपण आपल्या मतदारासाठी 24 तास उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. आपणास मतदार राजांनी दिलेल्या सहकार्यामुळे जनसेवेस कारणीभूत आहे. यापुढेही आपले समाजकार्य कायमस्वरूपी चालू राहणार असे ते म्हणाले.

Goa
Goa Election 2022: काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाक्यांचे बार

तसेच, काँग्रेसचे (Congress) नेते संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) यांनी आपण आज घरात कुटुंबासमवेत घालवला असल्याचे सांगितले. मुरगाव मधून मतदारांनी आपला कौल आपल्या बाजूने दिला असल्याचे विश्वास पूर्वक सांगितले. आपण केलेल्या आवाहनाला मतदारांनी साथ देऊन आपल्या बाजूने मतदान केले आहे. असा दावा श्री आमोणकर यांनी सांगताना शांततापूर्ण वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली यात आपल्या समर्थकांनी शिस्तबद्धपणे कार्य केल्याबद्दल समर्थकांचे धन्यवाद मानले. गोव्यात भाजप विरोधाची विरोधात लाट होती त्याचा काँग्रेसला नक्कीच लाभ होईल असा विश्वास श्री आमोणकर यांनी व्यक्त केला. गेल्या दीड-दोन वर्षाच्या कालावधीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतून काल सुटकारा मिळाला असला तरी माझे समाजकार्य चालुच राहणार असल्याचे ते म्हणाले.

Goa
Goa Aap: काँग्रेस आणि भाजपा एकाच माळेचे मणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाबोळी मतदार संघाचे उमेदवार फिलिप डिसोझा यांनी आज आपण रिलॅक्स मोड मध्ये आपल्या परिवारा समवेत दिवस घालवला असल्याचे सांगितले. गेले पाच महिने आपण आपला दाबोळी मतदार संघात प्रत्येक घर फ्लॅटमधील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यात मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नव्हे तर जुझे फिलिप डिसोझा म्हणून आपले स्वागत केले व आपणास आशीर्वाद दिला. याबद्दल त्यांनी सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त केले. आपण समाज सेवेस सदैव तत्पर राहणार असल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या सहकार्यामुळे आज प्रत्येक मतदारांना गाठून त्यांचा विश्वास संपादन केला असल्याचे ते म्हणाले.

Goa
Goa Election 2022: बाणावली काँग्रेस गट अध्यक्षांचा तृणमुल पक्षात प्रवेश

कुठ्ठाळी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आतोन वास यांनी आजही आपले समाज कार्य चालूच असल्याचे सांगितले. काल निवडणूक झाली असली तरी मी माझे समाजकार्य चालुच ठेवले आहे. माझ्या कुटुंबाला आज मी वेळ दिला नसला तरी समाज कार्य हेच माझे कुटुंबासाठी कार्य असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी माझ्या कुटुंबाचे मला पूर्ण सहकार्य असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षभराच्या दुगदुगीतुंन आज रिलॅक्स झालो. थोडीफार उसंत मिळाली. माझे समाजकार्य पुढे असेच चालू राहणार आहे. याकामी माझ्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहे. त्यांच्या सहकार्यानेच मी माझ्या मतदारांचा विश्वास संपादन केला असल्याचे आतोन वास शेवटी म्हणाले.

वास्को मतदारसंघाचे भाजप उमेदवार कृष्णा साळकर यांनी आज आपल्या कुटुंबासमवेत घालवला. दिवसभर घरात वेळ घालून संध्याकाळच्या सत्रात बायणा समुद्रकिनारी आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवला. आपणास मतदारांनी दिलेले प्रेम म्हणजेच माझा विजय निश्चित असल्याचे त्यांनी खात्रीलायक सांगितले. तसेच प्रत्येक मतदाराबरोबर माझ्या कार्यकर्त्यांचेही मनापासून आभार त्यांनी व्यक्त केले.

Goa
Goa Election 2022: 'तृणमूल' हीच देशातील खरी काँग्रेस, लुईझिन फालेरो यांचा काँग्रेसवर घणाघात

वास्को मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार कार्लुस आल्मेदा यांनी आपला दिवस रिलॅक्स मोडमध्ये आपल्या कुटुंबियांसमवेत घालवला. आपल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अथक परिश्रम घेतले असून यात मतदारांचा विश्वास संपादन करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मतदाराने ही माझ्यावर विश्वास दाखवून माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले असल्याने माझा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com