राजकीय पुढाऱ्यांनी गोव्याचं वैभव नष्ट केलं: अरविंद केजरीवाल
Arvind Kejriwal Dainik Gomanatak

राजकीय पुढाऱ्यांनी गोव्याचं वैभव नष्ट केलं: अरविंद केजरीवाल

प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारमधील मंत्री पैशासाठी सरकारी नोकऱ्यांचा सौदा करत आहेत.

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहेत. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या (Goa Election 2022) तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. (Arvind Kejriwal has said that political leaders have destroyed the glory of Goa)

दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटले की, 'भगवंताने गोव्याला सर्व काही दिले आहे. निसर्गसौंदर्य, खनिजसंपत्ती, समुद्र किनारा हे गोव्याला लाभेलेले वरदान आहे. मात्र इथल्या राजकीय नेत्यांनी गोव्याचं वैभव नष्ट केलं आहे. प्रमोद सावंत सरकारमधील मंत्री पैशासाठी सरकारी नोकऱ्यांचा सौदा करत आहेत. तर काही मंत्री अवैध धंदा करत आहेत. अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी आपण सर्वजण आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहे.'

Arvind Kejriwal
Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसने चार उमेदवारांची केली घोषणा

ते पुढे म्हणाले, ''गोव्याच्या जनतेला एकत्र आणण्यासाठी आम्ही एक मिशन राबवत आहोत. नवी दिशा नवे गोयं. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला फक्त पक्ष, सरकार बदलायचे नसून पूर्ण व्यवस्था बदलायची आहे. आगामी निवडणुकीच्या माध्यमातून गोव्यात नवी क्रांती घडणार आहे. आम्ही गोव्यातील जनतेला सुखकर जीवन प्रदान करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर गोव्यात फोफावलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालायचा आहे. नव्या गोव्याची निर्मीत करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र मिळून काम करु.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.