गोव्यात सुरु असलेल्या आयाराम-गयारामांच्या खेळाचं मूळ हरियाणामध्ये

भारतीय राजकारणात कायम चर्चेत असलेल्या आयाराम-गयाराम या वाक्प्रचाराची कहाणी; आमदारांच्या हेराफेरीने सरकार पाडण्याची आणि सत्ता स्थापन करण्याची प्रक्रिया 40 वर्षांपूर्वी घडली होती
Ayaram Gayaram phrase which started in Goa was born in Haryana

Ayaram Gayaram phrase which started in Goa was born in Haryana

Dainik Gomantak

2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने राज्यात सरकार बनवण्यात आले ते भारतीय राजकारणात नवीन नाही. परंतु आता हा ट्रेंड नक्कीच वाढत आहे. गोव्यात या पक्षांतराचा विक्रमच मोडला आहे. गोव्यात गेल्या पाच वर्षात पन्नास टक्क्यांहून अधिक आमदार 'आयाराम-गयाराम' राजकारणाचे वास्तवात रूपांतर करत आहेत. गोव्यात सरकार स्थापनेदरम्यान हा खेळ मोठ्या प्रमाणावर झाला होता आणि तो अगदी येणाऱ्या निवडणुकी पर्यंत सुरूच आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक नुकसान काँग्रेस पक्षाचे झाले.

2017 मध्ये जेव्हा गोव्यातील निवडणुकीचे (Goa Election) निकाल आले, तेव्हा काँग्रेसने (Congress) 17 जागा जिंकल्या आणि भाजपने (BJP) 13 जागा जिंकल्या होत्या. इतर पक्षांमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) 01 आणि गोवा फॉरवर्ड पार्टीला (Goa Forward party) 03, अपक्षांनी 03 जागा जिंकल्या होत्या. भाजपने गोवा फॉरवर्ड पक्षासोबत निवडणूकपूर्व युती केली होती. या अर्थाने भाजपकडे 16 जागा होत्या, परंतु बहुमतासाठी अद्याप 04 जागांची गरज होती. तेव्हा एका झटक्यात काँग्रेसचे 10 आमदार फूटून भाजपमध्ये गेले आणि त्यांचे सरकार गोव्यात स्थापन झाले.

आता यंदाही पुन्हा निवडणुकीपूर्वीचा खेळ सुरू झाला आहे. भाजपचे आमदार तृणमूल काँग्रेस (TMC) आणि आम आदमी पक्षात (AAP) जात असताना काँग्रेसचे आमदारही दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. अशा राजकारणावरून भारताच्या राजकारणात आयाराम-गयाराम हा वाक्प्रचार रूढ झाला होता. आणि त्याचीच प्रचिती गोव्यात येत आहे. देशात आता ज्या प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे, येणाऱ्या वर्षात पाच राज्यांमध्ये निवडणुकीनंतर (Goa Assembly Election) निकाल लागल्यानंतरही हाच प्रकार चालेल असेच चित्र दिसत आहे.

आमदारांच्या उलथापालथची इतिहासात नोंद

भारतीय राजकारणात कायम चर्चेत असलेल्या आयाराम-गयाराम या वाक्प्रचाराची कहाणी काय आहे ते जाणून घेऊया. आमदारांच्या हेराफेरीने सरकार पाडण्याची आणि सत्ता स्थापन करण्याची प्रक्रिया 40 वर्षांपूर्वी घडली होती आणि हा वाक्प्रचार रूढ झाला. राजकीय जाणकारांना किंवा आधीच्या पिढीतील लोकांना या कथा माहिती आहेत. ही गोष्ट 40 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा 1979 मध्ये हरियाणात राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण जाले होते. जनता पक्षाशी निगडीत चौधरी देवीलाल यांचे हरियाणात सरकार होते. अशा परिस्थितीत राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले भजन लाल यांनी देवीलाल यांच्या डोळ्यांतून सुरमा चोरल्यासारखी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हिसकावून घेतली. पण त्यावेळी पक्ष आणि आमदारांची कशी उलथापालथ झाली याची इतिहासात नोंद आहे.

<div class="paragraphs"><p>Ayaram Gayaram phrase which started in Goa was born in Haryana</p></div>
मुक्तीच्या 60व्या वर्षात प्रवेश करणारा गोवा भाजपच्या हातातून निसटणार का?

भजनलाल यांनी फोडले होते 40 आमदार

चौधरी देवीलाल हे त्यांचे सरकार अडचणीत आलेले दिसत होते म्हणून त्यांनी आपल्या 40 आमदारांना नजरकैदेत टाकून घराला किल्ला बनवले होते. आमदारांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बंदुकीच्या धाकावर ठेवण्यात आलेल्या आमदारांची विशेष परवानगी घ्यावी लागलत होती. अशा स्थितीत भजनलाल मंत्री असल्याने त्यांचे येणे-जाणे थांबवता येत नव्हते. भजनलाल यांनी नजरबंद केलेल्या आमदारांच्या कुटुंबीयांची बाजू घेवून त्यांचे प्रस्ताव आमदारांपर्यंत पोहोचवले. आता त्यामुळे भजनलाल आणि देवीलाल असे दोन गट तयार झाले. त्या बालेकिल्ल्यात कैदेत असलेले आमदार कुठल्या पक्षात जायचे या विचारात रात्रभर जागे राहायचे. शेवटी, भजनलालचे प्रस्ताव खूप मोहक होते आणि 40 आमदार त्यांच्या अश्वासनांना बळी पडले. आणि भजनलाल यांनी देवीलाल यांचे सरकार पाडले आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले.

लाचेच्या रूपात तूप-उंट

भजनलाल यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांच्याकडे अशी एक खास कला होती की, त्यांना कोणाची काय गरज आहे हे चटकन समजायचे. देवीलालच्या लोकप्रियतेसमोर भजनलालची ही कला लोकांना भुरळ घालण्यासाठी कामी आली आणि त्यांच्याकडे खरच हि कला आहे हे पुन्हा सिद्ध झाले होते. कुणाकडे सरकारी नोकरी, कुणाकडे प्लॉट, कुणाकडे रोख रक्कम, प्रत्येकाच्या गरजेनुसार भजनलालकडे सगळ्या समस्येचा तोडगा होता. राजकारणात येण्यापूर्वी ते तूप विक्रीचा व्यवसाय करायचे आणि अवघ्या 8 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कौशल्यामुळे ते मुख्यमंत्री झाले हे सिद्ध झाले होते. भजनलालची 'मोठ्या लोकांना' लाच देण्याची पद्धत अनोखी होती. कधी मोरारजी देसाईंना तुपाचे डबे पाठवले, तर कधी वरुण गांधींच्या जन्मानिमित्त संजय गांधींना उंट पाठवले.

ऐतिहासिक दलबदल

पक्षांतर करणारे भजनलाल जनता पक्षाशी जोडले गेले आणि आणीबाणीनंतर 1977 मध्ये जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा ते देवीलालचे सरकार उलथून स्वतः मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 1980 मध्ये केंद्रात सत्तापालट झाला आणि त्यानंतर इंदिरा गांधींचे सरकार स्थापन झाले. जनता पक्षाचे जहाज बुडाल्याचे भजनलाल यांना लगेच समजले आणि त्यांनी लगेचच आपल्या 40 आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एवढा मोठा पक्षांतर देशाने पहिल्यांदाच पाहिला होता. या पक्षांतरानंतरही हरियाणात राजकीय अस्थिरता कायम राहिली आणि ती 90 च्या दशकाच्या अखेरीपर्यंत कायम राहिली. कधी देवीलाल यांचे सरकार बनले, तर कधी भजनलालचे. नंतर इतर नेते आणि प्रसारमाध्यमांमध्येही या दोन लालांमध्ये राजकीय फिक्सिंग असल्याचे म्हणत गेले.

<div class="paragraphs"><p>Ayaram Gayaram phrase which started in Goa was born in Haryana</p></div>
फर्स्ट क्लास राज्यावर थर्ड क्लास राजकारण्यांची सत्ता; केजरीवालांचा घणाघात

'आया राम गया राम'

भजनलाल यांनी पहिल्यांदा हरियाणात सत्तापालट केल्यावर असेच चालले होते, त्या काळात भजनलाल कॅम्पच्या जवळचे मानले जाणारे आमदार गयालाल होते. त्यानंतर अनेक आमदार, न्यायाधीश आणि सरकारी अधिकाऱ्यांवर दिल्ली, चंदीगड आणि पंचकुला येथील भूखंड वाटपाचे आरोप होत होते. गयालाल यांना दोन भूखंड दिल्याचेही आरोप झाले होते. तेच गयालाल यांनी राजकीय उलथापालथीच्या काळात 15 दिवसांत तीनदा पक्ष बदलला होता.

या आमदाराच्या पक्षांतरामुळे राजकीय वर्तुळात ही म्हण घुमली आणि भजनलालच्या कारनाम्याची चर्चा होऊ लागली. सत्तेचे समीकरण असलेल्या भजनलालबद्दल एका सरकारी अधिकाऱ्याने इंडिया टुडेला सांगितले होते की, "भजनलालमध्ये देवालासुद्धा फसवण्याची क्षमता आहे. मात्र, ही कथा राजकारणातील खुर्चीसाठी शक्य तो सर्व मार्ग शोधण्याची, प्रत्येक कायद्यातील त्रुटी शोधण्याची आणि नैतिकतेला बगल देण्याची कथा आहे, जी आजकाल कर्नाटकात थेट पाहायला मिळते."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com