पर्येची भाजप उमेदवारी दिव्या राणे यांना, होंडा परिसरात स्वागत
Dr. Divya RaneDainik Gomantak

पर्येची भाजप उमेदवारी दिव्या राणे यांना, होंडा परिसरात स्वागत

डॉ. दिव्या राणे (Dr. Divya Rane) यांना घोषित झाल्याने होंडा परिसरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.

पिसुर्ले: राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे, त्यात राजकीय इतिहासात महत्वाच्या अशा पर्ये मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर कोण निवडणूक लढवणार या संबंधी गेल्या कित्येक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती, त्यामुळे सर्व राज्याचे लक्ष भारतीय जनता पक्षाचे (BJP) तिकीट पर्येत कोणाला मिळेल या कडे लागून राहिले होते. (BJP has fielded Divya Rane from Poriem Constituency)

त्याप्रमाणे आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची पाहिली यादी जाहीर करण्यात आली आणि त्या यादीत पर्ये मतदार संघाची उमेदवारी भाजपाने अपेक्षा प्रमाणे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) यांच्या सौभाग्यवती डॉ दिव्या राणे यांना जाहीर केल्याने, बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या या मतदारसंघातील उमेदवारी संबंधीच्या चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे, तर या मतदारसंघातील उमेदवारी डॉ. दिव्या राणे (Dr. Divya Rane) यांना घोषित झाल्याने होंडा परिसरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.

Dr. Divya Rane
Goa Election: ‘आप’मुळे समीकरणे बदलण्याची चिन्हे?

दरम्यान, गोवा विधानसभेच्या निवडणुका पुढील महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे, त्यामुळे विविध पक्षांचे उमेदवार जाहीर होऊन त्यांनी पर्ये मतदार संघात प्रचार सुरू केला आहे, त्यात प्रथम आप पक्षांची उमेदवारी विश्वजित कृष्णराव राणे यांना देण्यात आली आहे, त्याच प्रमाणे तृणमूल काँग्रेस पक्षाची उमेदवारी अँड गणपत गावकर यांना जाहीर झाली आहे, तर आता भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर डॉ दिव्या राणे या निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरणार आहे. सद्या या तीन महत्त्वाच्या अशा पक्षाचे उमेदवार जाहीर झाले असून काँग्रेस, शिवसेना इतर अपक्ष उमेदवार जाहीर होणे बाकी आहे, त्यामुळे या मतदार संघात किती उमेदवार असतील हे स्पष्ट झाले नाही.

Dr. Divya Rane
Goa Election: उमेदवारीसाठी मिलिंद नाईकांचे नाव चर्चेत?

तसेच, या मतदारसंघात आज पर्यंत विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे वर्चस्व राहीलेले आहे, परंतू ते या निवडणुकीपासून राजकीय संन्यास घेणार असल्याचे दिसून येत असल्याने ते निवडणूक लढवणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप, आप, तृणमूल काँग्रेस या पक्षाच्या उमेदवारा मध्ये सामना होणार असल्याचे संकेत दिसत आहेत. या मतदारसंघात भाजप पक्षाची उमेदवारी जरी उशीरा जाहीर झाली तरी डॉ दिव्या राणे यांनी आपले पती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून पर्ये मतदार संघात या पुर्वी जाहीर सभा तसेच कोपरा बैठका घेऊन मतदारा पर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्या अवघ्या काही दिवसांत या मतदारसंघातील लोक प्रिय नेत्या म्हणून गणल्या जात आहे. त्यामुळे त्याना आज भारतीय जनता पक्षाची उमेदवारी घोषित झाल्याने त्यांचें विविध माध्यमातून जोरदार स्वागत होताना दिसत आहे.

शिवाय, या संबंधी होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की पर्ये मतदार संघात आता पर्यंत विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी तसेच त्यांचे चिरंजीव तथा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रयत्नाने झाला आहे, तर आता आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या पत्नी डॉ दिव्या राणे यांच्या रुपाने आम्हाला आमदार प्राप्त होणार असल्याने आनंद होत आहे, या मतदारसंघात विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी विजय डॉ दिव्या राणे यांचाच होणार असल्याने त्यांच्या उमेदवारी वरून स्वागत होणे हे स्वाभाविक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.