भाजपचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे सदस्य गजानन तिळवे यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आज भाजपचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे सदस्य गजानन तिळवे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय वातावरणाला वेगळे वळण दिले आहे.
भाजपचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे सदस्य गजानन तिळवे यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश
Bjp national executive member of Bjp yuva morcha Gajanan Tilvle joint congressDainik Gomantak

पणजी: भाजपचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे सदस्य गजानन तिळवे यांनी आज कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत पक्षाचे जेष्ठ नेते दिगंबर कामत यांनी केले. भारतीय जनता पक्ष (भाजप) यावेळी गोवा विधानसभेची निवडणूक सत्ताविरोधी लाटेत आणि आपले सर्वात मोठे नेते मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत लढणार आहे.

Bjp national executive member of Bjp yuva morcha Gajanan Tilvle joint congress
वास्कोत 'जागो ग्राहक जागो' अंतर्गत जागरूकता कार्यक्रम

गजानन तिळवे यांच्यासह संकेत पार्सेकर, विनय वायंगणकर, ओम चोडणकर, अमित नाईक, झिओन डायस, बासिल ब्रागांझा, नीलेश धारगळकर, प्रतीक नाईक आणि नीळकंठ नाईक यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. “काहीही करून सत्ता मिळवणे हा भाजपचा हेतू आहे. भाजपमध्ये तत्त्वे नाहीत. हा पक्ष आता बदलला आहे. यामुळे मी भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मला आशा आहे की काँग्रेस बहुमताने जिंकेल आणि सरकार स्थापन करेल.’’

दिनेश गुंडू राव म्हणाले की, "गजानन तिळवे यांच्या प्रवेशाने काँग्रेस पक्ष मजबूत होईल. “संपूर्ण भारतात आणि गोव्यात भाजप अपयशी ठरला आहे. भाजपमध्ये कोणतीही तत्त्वे नाहीत, नैतिकता नाही, आणि ते सर्वात भ्रष्ट सरकार आहे.’’

विधानसभा निवडणुकीत जनता भाजपला नाकारेल, असे दिनेश राव म्हणाले. ‘‘केवळ काँग्रेसच (Congress) स्थिर सरकार देऊ शकते. कटीबद्धता आणि राजकारणाची जाण असलेले तरुण नेते काँग्रेसमध्ये सामील होत आहेत याचा मला आनंद वाटतो.’’ भाजपने (BJP) लोकशाहीची हत्या केल्याचे तरुणांना कळले असून त्यामुळे ते काँग्रेसकडे आकर्षित होत असल्याचे दिगंबर कामत म्हणाले. "आम्ही गजानन तिळवे आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे काँग्रेस पक्षात स्वागत करतो." असे ते म्हणाले.

ॲड. वरद म्हार्दोळकर म्हणाले की, "भाजपच्या युवा मोर्चात फॅमिली राज होत असून, त्यामुळे तिळवे यांना भाजप सोडावा लागला. "केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही ते काँग्रेसमध्ये सामील झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो."

Bjp national executive member of Bjp yuva morcha Gajanan Tilvle joint congress
शिवसेना गोवा राज्य सरचिटणीस मिलिंद गावस यांचे निधन

गोव्यात (Goa) 14 फेब्रुवारीला मतदान होत आहे आणि 2017 मध्ये निवडून आलेल्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपत आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी अनेक नेत्यांनी पक्ष बदलला. पक्ष बदलणारे बहुतांश आमदार काँग्रेसचे होते, ज्यांना भाजपमध्ये आपले भविष्य उज्ज्वल दिसत होते. मात्र आज भाजपचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे सदस्य गजानन तिळवे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय वातावरणाला वेगळे वळण दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.