फातोर्डा भाजपमध्ये पुन्हा फूट

वनिता मडकईकर आणि भंडारी युवा नेते दत्तप्रसाद मांद्रेकर यांचा राजीनामा
फातोर्डा भाजपमध्ये पुन्हा फूट
फातोर्डा भाजपमध्ये पुन्हा फूटDainik Gomantak

मडगाव: दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली फातोर्ड्यात (Fatorda constituency) काम करण्यास अनेक भाजप (BJP) कार्यकर्ते नाराज आहेत. या मतदारसंघात पुन्हा फूट पडली आहे. फातोर्ड्याचा भाजप दामू नाईक यांनी आपली खासगी कंपनी केली आहे, असा आरोप करीत भंडारी युवा नेते दत्तप्रसाद मांद्रेकर यांनी काल (शुक्रवारी) भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

मांद्रेकर हे भाजपच्या ओबीसी विभागाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच फातोर्डा प्रभाग 4 चे शक्ती केंद्र प्रमुख आहेत. त्यांनी त्याही पदांचा राजीनामा दिला आहे. दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली फातोर्डात भाजपला भवितव्य नाही, असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात नाईक यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या फोनवर संपर्क केला असता, त्यांनी फोन न घेतल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

फातोर्डा भाजपमध्ये पुन्हा फूट
कळंगुटचे गत वैभव पुन्हां परतण्यासाठी एकजुट व्हा : पी. चिदंबरम

यापूर्वी दामू नाईक यांच्याविरोधात मंडळ समितीचे दोन्ही सदस्य प्रमोद नाईक आणि मंदार सावर्डेकर यांनी बंड करताना गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्या व्यासपीठावर चढून सरदेसाई यांची स्तुती केली होती. त्यामुळे त्या दोघांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद अजूनही शमलेले नाहीत, तोच आता मांद्रेकर यांनी राजीनामा दिला आहे. आणखीही काही सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. फातोर्डा भाजप मंडळाचे माजी सरचिटणीस दिलीप नायक यांनीही दामू नाईक यांच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि संघटनमंत्री सतीश धोंड यांच्याकडे तक्रार केली आहे. दामू नाईक यांना यावेळी भाजपची उमेदवारी दिल्यास ते 5 हजार मतेही मिळवू शकणार नाहीत, असे तक्रारीत म्हटले होते.

फातोर्डा भाजपमध्ये पुन्हा फूट
बाबू आजगावकरांमुळेच पेडण्याचा सुपरफास्ट विकास

वनिता मडकईकर यांचाही राजीनामा

दामू नाईक यांच्या नेतृत्वाला आव्हान देत फातोर्डातील भाजपच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या आणि बूथ क्रमांक 37 च्या अध्यक्ष वनिता मडकईकर यांनीही भाजप सदस्यत्वाचा राजीनामा आज सदानंद शेट तानावडे यांना पाठवून दिला. दामू नाईक हे सामान्य कार्यकर्त्यांचे ऐकून घेत नाहीत. ते मनमानी करतात. त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com