भाजपाने सत्तरीतून फोडला प्रचाराचा नारळ; 'कमळ' फुलवण्याचे जे. पी. नड्डाचे आवाहन

विधानसभेच्या तसेच पंचायत, जिल्हा पंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला गोव्यातील जनतेने यश प्राप्त करून दिले आहे.
Assembly Elections
Assembly ElectionsDainik Gomantak

पिसुर्ले : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) संस्कृती प्रिय अशा गोव्यातील जनतेने राज्यात विकासाची गंगा आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाला साथ द्यावी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister of India Narendra Modi) यांची या लहानशा राज्यावर कृपा दृष्टी तसेच प्रेम आहे, त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे गोव्याला सुद्धा काहीच कमी पडू दिले नाही, त्यामुळे गेल्या दोन विधानसभेच्या तसेच पंचायत, जिल्हा पंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला गोव्यातील जनतेने यश प्राप्त करून दिले आहे.

त्याच प्रमाणे काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पक्षाला साथ द्यावी असे वाळपई येथिल बसस्थानकाच्या सभागृहात संपन्न झालेल्या सत्तरी तालुका भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आवाहन करून यावेळी सत्तरी तालुक्यातील दोन्ही जागांवर कमळ फुलवण्याचे असे भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (Bharatiya Janata Party National President J.P. Nadda) यांनी मत व्यक्त करून जणू काय भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.

Assembly Elections
'न्याय, सत्य, विकासासाठी भाजपलाच पुन्हा सत्तेवर आणा': जे.पी.नड्डा

यावेळी नड्डा पुढे म्हणाले की गोवा राज्य विकासाच्या दृष्टीने कसे पुढे जाईल याचा विचार करून केंद्र सरकारच्या माध्यमातून पुर्ण सहकार्य मिळत आहे, गोवा हे देशातील नंबर वन असे पर्यटन राज्य आहे, त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यात गरजेच्या असलेल्या साधन सुविधा निर्माण करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या स्थितीतीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी केलेल्या कार्या बद्दल त्यांनी गौरव उद्गार काढले.

त्यामुळे या पेक्षा विकास करण्यासाठी आणि स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या स्वप्नातील गोल्डन गोवा बनवण्यासाठी त्यांनी अटल शेतूच्या उद्घाटन प्रसंगी शेवटच्या क्षणी दिलेल्या हाव ईज जोश हा मंत्र ध्यानात ठेऊन सत्तरीत तालुक्यातील दोन्ही मतदार संघात कमळ फुलवण्यासाठी त्याच जोशाने सक्रिय राहाव असे आवाहन केले.

या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजपा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोवा प्रभारी सी. टी. रवी, मध्ये प्रदेशातील खासदार सय्यद झापर, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजेश्री काळे, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, उजगाव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, वाळपई नगरपालिकेच्या नगराध्यक्ष शेयजीन शेख, पर्ये भाजप मंडळाचे अध्यक्ष गोविंद कोरगावकर, वाळपई भाजप मंडळाचे अध्यक्ष रामनाथ डांगी, तसेच बाराही पंचायतीचे सरपंच आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सुरवातीलाच सांगितले की आपल्या व आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या मध्ये कोणताच दुरावा नसून ही सगळी कारस्थाने विरोधी पक्ष करीत आहे. आपले सरकार हे सबका साथ सबका विकास या तत्त्वावर चालते, त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत सरकारी योजना पोचवण्यासाठी आमचे स्वयंपूर्ण मित्र झठत आहे, यामुळे गोवा राज्य आत्मनिर्भर भारतात स्वयंपूर्ण बनत चालले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्तरीत तालुक्यातील दोन्ही मतदार संघ धरून राज्यात, 22 प्लस, आमदार निवडून येऊन पुन्हा भाजपाचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.

Assembly Elections
राष्ट्रीय बगल महामार्गावरील "त्या" घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम सुरु;पाहा व्हिडिओ

यावेळी प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की विद्यमान आमदार तथा आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सन 2017 साली घेतलेला निर्णय योग्य होता, त्यामुळे गेल्या पाच वर्षांत सत्तरीचा विकास झपाट्याने झाला आहे, सद्या राज्यात विविध राजकीय पक्षांनी आपली दुकाने उघडली आहेत, त्यामुळे सत्तरीत तालुक्यातील दोन्ही मतदार संघात गेल्या दोन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले एका पक्षात गिरायीक म्हणून गेले आहे, ते कधीही भाजपाचे कार्यकर्ते नव्हते, त्यांना निवडणूकीसाठी भाजपाने पक्षात घेऊन उभे केले होते त्याचा कोणताही परिणाम भारतीय जनता पक्षावर होणार नाही, असे काही दिवसांपूर्वी वाळपई तसेच पर्ये मतदार संघातील सत्यविजय नाईक आणि विश्वजीत कृष्णाराव राणे आप पक्षात प्रवेश केलेल्या मुद्यावर उद्देशून मत व्यक्त केले.

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी स्वागतपर भाषण करताना काही प्रमाणात भावूक झाले आणि म्हणाले की आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिलेल्या सहकार्याची महिती दिली, त्यामुळेच राज्यात सुपरस्पेशलिटी विभाग उभा राहिला आहे, त्याच प्रमाणे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका करताना सांगितले की सत्तरी तालुक्यात कितीही वेळा येऊन गेला तरी सत्तरी तालुक्यातील स्वाभिमानी जनता त्यांना कधीही साथ देणार नाही, सत्तरीतील दोन्ही मतदारसंघातील जनते कडे आमचे भावनिक नाते जुळले आहे, त्या नात्यात कधीही दुरावा निर्माण होणार नाही.

त्याच प्रमाणे रोजगाराच्या बाबतीत जे आश्वासन दिले आहे ते पुर्ण करूनच निवडणूकीला जाणार सांगून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पुर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार असून, त्याची सुरुवात सत्तरी तालुक्यातील दोन्ही मतदार संघात भाजपाचे दोन्ही आमदार निवडून आणून सरकारच्या विजयाची गुढी सत्तरीतून उभी करण्याची ग्वाही यावेळी मंत्री विश्वजीत राणे यांनी पक्ष श्रेष्ठींना देऊन आपली पुढची रणनीती स्पष्ट केली. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे समयोचित भाषण झाले. समई प्रज्वलित करून भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले, या मेळाव्याचे सुत्रसंचलन जेष्ठ पत्रकार उदय सावंत यांनी केले.

मेळाव्यातील ठळक वैशिष्ट्ये या सभेला सुमारे आठ हजार नागरिकांची गर्दी होती, त्यामुळे आयोजकांनी सभागृहाबाहेर मंडप उभारून स्क्रीनची व्यवस्था केली होती. आरोग्य मंत्री (Minister of Health) विश्वजीत राणे यांच्या भाषणाला कार्यकर्त्यांनी उत्सुपुर्द प्रतिसाद देऊन त्यांच्या प्रत्येक शब्दाला टाळ्यांचा कडकडाट होत होता. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सुमारे अर्धा तास भाषण केले. सभागृहात प्रचंड गरमी असताना सुद्धा तीन तास एकही कार्यकर्ता जागेवरून हालला नाही. दोन्ही मतदार संघातील कार्यकर्त्यांना सभा स्थळी आणण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com