'अरविंद केजरीवाल फक्त राजकीय फाद्यासाठी बोलतायेत': मुख्यमंत्री प्रमोद सावंत

उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना उमेदवारी देण्यासाठी आम आदमी पक्षासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुढे आले आहेत.
'अरविंद केजरीवाल फक्त राजकीय फाद्यासाठी बोलतायेत': मुख्यमंत्री प्रमोद सावंत
Chief Minister Dr. Pramod SawantDainik Gomantak

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहेत. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. यातच आज भाजपने आपल्या 34 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. (Chief Minister Dr Pramod Sawant has said that Arvind Kejriwal speaks only for political gain)

मागील काही दिवसांपासून गोव्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या पणजी मतदारसंघामधून कुणाला उमेदवार मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र अखेर बाबूश मोन्सेरात (MLA Babush Monserrat) यांना भाजपने आगामी विधानसभा निवडणूकीसाठी पणजीमधून उमेदवारी दिली. यामध्ये मात्र गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना भाजपने तिकीट नाकारले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्यासाठी आम आदमी पक्षासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुढे आले आहेत.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसने चार उमेदवारांची केली घोषणा

आमचे केंद्रीय नेते उत्पल पर्रीकर यांच्या संपर्कात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना वेगळ्या गोष्टी बोलल्या होत्या. आणि आता ते राजकीय फायद्यासाठी वेगळ्या गोष्टी बोलत आहेत. गोव्यातील लोकांना हे चांगलंच समजलं आहे. त्यामुळे जनता त्यांना चांगलाच धडा शिकवेल, असं यावेळी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्पल पर्रीकरांचा विषय हा भाजपची अंतर्गत बाब आहे. आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, मात्र ते निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरले तर, आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षांना पाठिंबा आवाहन करेन असं म्हटलं होतं.

दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, 'भगवंताने गोव्याला सर्व काही दिले आहे. निसर्गसौंदर्य, खनिजसंपत्ती, समुद्र किनारा हे गोव्याला लाभेलेले वरदान आहे. मात्र इथल्या राजकीय नेत्यांनी गोव्याचं वैभव नष्ट केलं आहे. प्रमोद सावंत सरकारमधील मंत्री पैशासाठी सरकारी नोकऱ्यांचा सौदा करत आहेत. तर काही मंत्री अवैध धंदा करत आहेत. अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी आपण सर्वजण आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहे.'

Chief Minister Dr. Pramod Sawant
Goa Assembly Election 2022: TMC ने 11 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

ते पुढे म्हणाले, ''गोव्याच्या जनतेला एकत्र आणण्यासाठी आम्ही एक मिशन राबवत आहोत. नवी दिशा नवे गोयं. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला फक्त पक्ष, सरकार बदलायचे नसून पूर्ण व्यवस्था बदलायची आहे. आगामी निवडणुकीच्या माध्यमातून गोव्यात नवी क्रांती घडणार आहे. आम्ही गोव्यातील जनतेला सुखकर जीवन प्रदान करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर गोव्यात फोफावलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालायचा आहे. नव्या गोव्याची निर्मीत करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र मिळून काम करु.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.