Vijay Sardesai
Vijay Sardesai Dainik Gomantak

गोवा पुन्हा मुक्त करण्याची संकल्पना 19 डिसेंबरला: सरदेसाई

गोवा फॉरवर्ड पक्ष गोमंतकियांच्या हितासाठी काम करत आहे.

मडगाव: गोवा मुक्ती दिनी, 19 डिसेंबर रोजी, समविचारी लोकांच्या भेटीगाठी घेऊन गोवा पुन्हा वसाहतवादातून मुक्त करण्याच्या संकल्पनेचे अनावरण करणार असल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी शनिवारी सांगितले. पुढील सरकार कोण बनवणार आणि विधानसभा (Assembly election) निवडणुकीत कोण जिंकणार हे आम्ही या दिवशी सांगू, असे सरदेसाई म्हणाले.

"गोयांत कोळसो नाका" चे संस्थापक सदस्य आणि " गोंयकार एक पावल एकचाराचें" संघटनेचे निमंत्रक विकास भगत यांचे गोवा फॉरवर्ड पक्षामध्ये स्वागत करताना, सरदेसाई यांनी लोकांना आश्वासन दिले की त्यांचा पक्ष सत्तेत आल्यावर आणि सरकार (Government) स्थापन झाल्यावर पहिल्याच दिवशी ते कोळसा आंदोलन आणि लिनियर प्रकल्प साठी गुन्हा नोंद झालेल्यांवरचे गुन्हे मागे घेणार आहे. ज्या लोकांवर कोळसा आणि लिनियर प्रकल्पांच्या विरोधात आंदोलन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते खटले आम्ही मागे घेणार आहोत.’’ असे सरदेसाई म्हणाले.

Vijay Sardesai
Goa: नौदलातर्फे INHS रक्तदान शिबिराचे आयोजन

“या लोकांनी राज्याला कोळशापासून वाचवण्यासाठी आणि आपल्या पर्यावरणाचे (environment) रक्षण करण्यासाठी आंदोलन केले. त्यामुळे या लोकांवरील खटले मागे घेऊन त्यांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. हे आम्ही सरकार स्थापनेच्या पहिल्याच दिवशी करू.” असे सरदेसाई म्हणाले.

सरदेसाई यांनी शनिवारी विकास भगतचे पक्षात स्वागत केले आणि गोव्याला कोळशापासून वाचवण्यासाठी ते काम करत असल्याचे सांगितले. विकास आमच्या पक्षाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख असतील, असे सरदेसाई म्हणाले. यावेळी गोवा फॉरवर्डचे नेते प्रशांत नाईक देखील उपस्थित होते.

विजय सरदेसाई यांनी सांगितले की गोमंतकिय शॅक ऑपरेटर्सना व्यवसाय करणे सोपे होईल आणि त्यासाठी MPT ला बायपास केले जाईल. "आम्हाला MPT कडून एनओसी का घ्यावी लागेल." असा प्रश्न त्यांनी केला.

Vijay Sardesai
Goa: तुळशी विवाह ही दुसरी मोठी दिवाळी

“गोव्याच्या समुद्रकिनार्‍यांवर शॅक्स उभारण्यासाठी एमपीटीची गरज असणार नाही. एमपीटीला बायपास करून आम्ही आमच्या गोमंतकियांना मदत करू, हा माझा शब्द आहे.’’ असे सरदेसाई म्हणाले.

भाजप सरकार हायकमांडच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असेही ते म्हणाले.

विकास भगत म्हणाले की, भाजप सरकार गोमंतकियांच्या हिताच्या विरोधात काम करत आहे. ‘गोवा फॉरवर्ड पक्ष गोमंतकियांच्या हितासाठी काम करत आहे, यासाठी मी या पक्षात प्रवेश घेतला आहे.’’ असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com