भाजप सरकारसह काँगेसने देखील आमचा धसका घेतलाय: आप

अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अनेक दौऱ्यांमध्ये गोव्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. आणि या योजनांना गोवेकरांचा उदंड प्रतिसाद देखील मिळत आहे.
भाजप सरकारसह काँगेसने देखील आमचा धसका घेतलाय: आप
Congress & BJP scared to Aam Aadmi Party Dainik Gomantak

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी त्यांच्या अनेक दौऱ्यांमध्ये गोव्यासाठी (Goa) विविध योजना जाहीर केल्या आहेत. आणि या योजनांना गोवेकरांचा उदंड प्रतिसाद देखील मिळत आहे. परिणामी काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) पक्ष आम आदमी पक्षाला (AAP) घाबरला आहे. त्यामुळे सध्या दोन्ही पक्ष सोशल मीडियावर ‘आप’वर टीका करण्यात व्यस्त आहेत. पण, त्यांना आम्ही जुमानत नाही असे विधान आपचे नेते अमित पालेकर यांनी केलं आहे. (Congress & BJP scared to Aam Aadmi Party)

पालेकर म्हणाले, आप सामान्य माणसासाठी काम करणारा पक्ष आहे. राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या नुकत्याच गोवा भेटीत ऑटो आणि टॅक्सी चालकांना देखील दिलासा दिला आहे . गोव्यात 25 हजार टॅक्सी चालक आहेत आणि कोविडच्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली, असे असूनही, सरकारने 11 हजार किमतीचे मीटर लावणे सक्तीचे केले आहे. हे मीटर पाच हजारात शक्य आहे. एवढं असून हे राजकारणी टॅक्सी चालकांना माफिया म्हणतात याचा आम्ही निषेध करतो असे सांगत त्यांनी गोवा सरकारवर टीका केली आहे.

Congress & BJP scared to Aam Aadmi Party
आणखी एक पर्रीकर वादळ होतेय सज्ज!

सरकारने टॅक्सी चालकांना कधीही व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे टॅक्सीचालक आणि पर्यटन संबंधितांमध्ये गैरसमज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे . गोवा माईल्स रद्द करण्याबाबत विचारले असता, पालेकर म्हणाले, व्यवसायाबाबत कोणतीही धोरणे आखण्यापूर्वी सरकारने टॅक्सी चालकांना विचारात घ्यायला हवे होते. मात्र सरकारने अवाक्षर काढण्याची तसदी घेतलेली नाही. सुदेश मयेकर म्हणाले, टॅक्सी चालक हे पर्यटन क्षेत्राचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. सरकार जेव्हा ऑपरेटर्ससाठी धोरणे ठरवते तेव्हा ते ऑपरेटर्सना विचारात घेत नाहीत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com