गोव्यात भाजपची सत्ता घालवण्यासाठी तृणमूल- कॉंग्रेस एकत्र?

तृणमूल- कॉंग्रेस पक्षांनी यापूर्वी एकत्र निवडणुका लढवल्या आहेत आतो गोव्यातही आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये केला जात आहे.
गोव्यात भाजपची सत्ता घालवण्यासाठी तृणमूल- कॉंग्रेस एकत्र?
Luizinho Faleiro, former chief minister of GoaTwitter/ @PTI

तृणमूल काँग्रेस (TMC) गोव्याच्या प्रभारी, लोकसभा खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव करण्यासाठी त्यांचा पक्ष "सर्वतोपरी प्रयत्न" करेल असे संकेत दिल्यानंतर, तृणमूल काँग्रेस आता गोवा निवडणुकीत (Goa Assembly Election) बाजी मारण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्यातून भाजपची (BJP) सत्ता घालवण्यासाठी तृणमूल कॉंग्रेससोबत (Congress) युती करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त हिंदूस्तान टाईम्सने दिले आहे. (Congress TMC tie up latest News)

Luizinho Faleiro, former chief minister of Goa
Goa Election 2022: पर्रिकर पुत्र उत्पल यांना शिवसेनेचं तिकीट?

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आणि आसपासच्या दोन्ही बाजूंमधील काही आठवड्यांच्या तणावानंतर याविषयावरं चर्चा घडून आली आहे. टीएमसी आक्रमकपणे आपला पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन्ही पक्षांनी यापूर्वी एकत्र निवडणुका लढवल्या आहेत, परंतु अलीकडच्या काळात झालेल्या संवादात कटुता निर्माण झाली आहे. या आधीही ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी गोवा दौऱ्यावर असताना राहूल गांधीना (Rahul Gandhi) युती करण्याचा अप्रत्यक्ष प्रस्ताव दिला होता. आणि आता कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनीही, "आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी इच्छुक असलेल्या कोणत्याही पक्षाचा पाठिंबा स्वीकारण्यास काँग्रेस तयार आहे असे म्हटले होते.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने हिंदस्थान टाइम्सला सांगितले की त्यांची गोवा राज्य युनिट टीएमसी कॉंग्रेससोबत युती करण्यासाठी उत्सुक आहे. आधीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो आणि काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी TMC मध्ये प्रवेश केल्याने गोव्याच्या राजकारणाला वेगले वळण मिळाले आहे.

Luizinho Faleiro, former chief minister of Goa
पहिल्यांदाच मनोहर पर्रीकरांच्या चेहऱ्याशिवाय भाजप मैदानात, काय आहे तयारी?

"आम्ही महाराष्ट्री गोमंतक प्लांट (MGP) सोबते निवडणुकीसाठी युती केली आहे. सध्या पार्टीमध्ये एका घटकसाठी जागा आहे गोव्यात भाजपचा (BJP) पराभव करण्याबाचा काँग्रेस किंवा आप TMCमध्ये सामील होऊ शकतात. माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गोव्यात TMC सोबत युतीबद्दल चर्चा करण्याची शक्यता आहे, असे आणखी एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने हिंदुस्थान टाइम्सला एका नेत्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com