भाजपकडून घाणेरडे राजकारण, लोकच बदला घेतील : सुदिन ढवळीकर

इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांसाठी ही चपराक असल्याचे उद्‍गार मगो (MGP) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी काढले.
भाजपकडून घाणेरडे राजकारण, लोकच बदला घेतील : सुदिन ढवळीकर
सुदिन ढवळीकर Dainik Gomantak

फोंडा: फोंडा पालिकेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे मगो पक्षाचे समर्थक असून इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांसाठी ही चपराक असल्याचे उद्‍गार मगो (MGP) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी काढले.

सुदिन ढवळीकर
गोव्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये झपाट्याने वाढ

फोंडा (Ponda) पालिकेचे सत्तारूढ मंडळ नगराध्यक्ष गिताली तळावलीकर, उपनगराध्यक्ष जया सावंत, नगरसेविका सीमा फर्नांडिस, अमिना नाईक तसेच फोंडा रायझिंगचे डॉ. केतन भाटीकर, माजी नगरसेवक शिवानंद सावंत यांनी काल सुदिन ढवळीकर यांची भेट घेतली, त्यावेळी ढवळीकर बोलत होते.

सुदिन ढवळीकर
गोव्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये झपाट्याने वाढ

सुदिन ढवळीकर म्हणाले की हा सत्याचा विजय आहे. फोंडा पालिकेची ज्यावेळेला निवडणूक झाली, त्यावेळेला मगोचे समर्थक नगरसेवक जास्त होते. मात्र इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या नगरसेवकांमुळे मगोला नंतरच्या काळात अनेक अडचणींना सामना करावा लागला. आता फोंडा पालिकेत ज्या दोन्ही महिला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष भूषवत आहेत, त्या अनुक्रमे गिताली तळावलीकर व जया सावंत या मगो नगरसेविका असून शेवटी मगो पक्षच बाजी मारणार आहे, हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

फोंड्यात मगो समर्थक उमेदवार एकसंध राहिले आणि त्यांना माजी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक व चंद्रकला नाईक यांनी यथोचित साथ दिली, त्यामुळेच आज मगोचे वर्चस्व सिद्ध होऊ शकले. आम्हाला घाणेरडे राजकारण करायचे नाही, सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करायची आहे. फोंड्याच्या विकासासाठी कार्य करायचे आहे, त्यामुळे फोंडावासीयांनी सहकार्य करावे असे सांगताना फोंड्यातील मगोचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी ज्या पद्धतीने काम केले आहे, त्यामुळे सर्वजण एकसंध राहिल्याचेही सुदिन ढवळीकर यांनी नमूद केले. फोंडा पालिकेतील दोन्ही महिला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षासह इतर सहकारी नगरसेवकांचे त्यांनी अभिनंदन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com