Election Commission: का वाढली उमेदवारांची चिंता?

निवडणूक आयोगाने 22 जानेवारीपर्यंत निवडणूक रॅली आणि रोड शोवरील बंदी वाढवल्यामुळे उमेवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Election Commission: का वाढली उमेदवारांची चिंता?
Election CommissionDainik Gomantak

Election Commission: गोव्यात सध्या सगळीकडे विधानसभा निडावणुकीची जोरदार तयारी दिसून येत आहे. राजकीय पक्ष निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections)आपले उमेदवार हळूहळू जाहीर करत आहेत. गोव्यात आपलेच सरकार यावे किंवा आपलाच पक्ष विजयी व्हावा यासाठी सगळ्याच पक्षांकडून बरोबरीची तयारी सुरू आहे. पण दुसरीकडे मात्र राज्यात कोरोनाने (Corona) चांगलेच डोके वर काढले आहे. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर वाढल्याने सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळेच राज्यात सरकारतर्फे प्रतिबंधात्मक निर्बंध लावण्यात आले आहेत.

Election Commission
Election Wind: अशोक वेळीप 'तृणमूल'मध्ये दाखल

सरकार आचारसंहितेचा (Social Code of Conduct) भंग होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी रात्री 11 नंतर मद्यविक्रीवर निर्बंध लावले आहेत. यावर्षी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. यातच भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांमध्ये राजकीय प्रचाराची रॅली काढण्यावरील बंदी पुढील आठवड्यापर्यंत वाढवली आहे. गेल्या आठवड्यात, पाच राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करताना, निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये 15 जानेवारीपर्यंत निवडणूक रॅली, रोड शो आणि कॉर्नर सभांवर बंदी घातली होती. पण आता या निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Election Commission
भाजपकडून तिकीट न मिळाल्यास उत्पल पर्रीकर पणजीतून अपक्ष लढणार?

कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही थांबलेला नसल्याची माहिती आयोजित बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्य सचिव आणि पाच राज्यांच्या प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला दिली. ओमिक्रॉन (Omicron) संसर्गाची तीव्रता डेल्टाप्रमाणे (Delta) प्राणघातक नसली तरी तूर्तास निर्बंध शिथिल करणे योग्य ठरणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या बैठकीत निवडणूक प्रचार रॅली आणि मिरवणुकांवरील बंदी किमान पुढील आठवड्यापर्यंत वाढवण्यावर एकमताने सहमती झाली. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना खुल्या जागी जास्तीत जास्त 300 व्यक्तींच्या किंवा बंदिस्त ठिकाणी एकूण क्षमतेच्या 50 टक्के एवढ्या प्रमाणात सभा घेण्याची परवानगी दिली आहे.

दरम्यान, 8 जानेवारीला जाहीर केलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या संचालनासाठी सुधारित व्यापक मार्गदर्शक तत्त्वे, 2022 मध्ये समाविष्ट असलेले सर्व उर्वरित निर्बंध कार्यरत राहणे आवश्यक आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, निवडणूक आयोगाने निवडणूक विजयाच्या उत्सवावरही बंदी घातली आहे. विजयाचे प्रमाणपत्र गोळा करण्यासाठी विजयी उमेदवारासोबत फक्त दोन व्यक्तींना परवानगी असणार असून या सर्व निर्बंधांचे पाचही राज्यामध्ये पालन करणे अनिवार्य असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com