गोव्यात TMC आणि Congressची भेट झाली असती तर...

आता TMC गोव्यात पाऊल ठेऊन काँग्रेसशिवाय इतर सर्व प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दीदी स्वत: गोव्यात तळ ठोकून आहेत. त्यांना गोव्यातील अनेक प्रादेशिक पक्षांचे नेते येऊन भेटत आहेत.
Elections 2022 If TMC and Congress had met in Goa
Elections 2022 If TMC and Congress had met in Goa Dainik Gomantak

गोवा विधानसभा निवडणुकीची पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राष्ट्रीय नेत्यांच्या गोवा भेटी देखील वाढल्या आहेत. आप, भाजप,TMC,आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा आणि गोवा दौरे सातत्याने सुरू आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोवा दौऱ्यावर आल्या आहेत. तसेच आजापसून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी देखील राज्यात आहेत. याआधी राहुल गांधी यांची आज होणारी गोवा भेट रद्द होण्याची शक्यता होती. परंतु राहुल गांधी यांचा 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी गोवा दौरा आयोजित करण्यात आला.

याच दरम्यान 28 ते 31 ऑक्टोबरला ममता बॅनर्जी यांचा देखील तीन दिवसीय गोवा दौरा तृणमूल काँग्रेसकडून आखण्यात आला. ममता बॅनर्जी यांचा दौरा राहुल गांधी यांच्या दौऱ्याबरोबर क्लॅश झाल्याने गोव्यात या दोघांची भेट होणार का? आणि गोव्यात भाजपला शह देण्यासाठी तृणमूल काँग्रेस, काँग्रेससह सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन नवीन समीकरणे जुळणार का? तसेच राज्यासह देशात मरगळ आलेल्या काँग्रेसला उभारी मिळणार का? गोव्यात जर हा फॉर्मुला चालला तर 2024 पर्यंत तो दिल्लीतील मोदी सरकारची झोप उडविणार का? अशा अनेक चर्चांना सध्या गोव्यासह देशभरात उधाण आले आहे.

Elections 2022 If TMC and Congress had met in Goa
किस्से गोवा निवडणूकीचे: जनमत कौलानंतरची गोवा निवडणूक

आता असा विचार करायचे झाले तर काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष गोवा निवडणुकीसाठी अजुनही कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाही. राज्यातील इतर प्रादेशिक पक्ष आणि भाजप विरोधी नेते यांनी बॅनर्जी यांची भेट घेण्याचा सापाटा सुरु केला आहे. अशावेळी जर काँग्रेस देखील त्यांना सामील झाले तर ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी चांगले राहील आणि दिल्लीतील मोदी सरकार विरोधात उभे ठाकण्यास देखील काँग्रेस त्याची मदत होईल. या सर्व गोष्ट जरी दिसताना सोप्या दिसत असल्यातरी त्या जुळवून आणणे आता काँग्रेसच्याच हातात आहे. अन्यथा गोव्यातील मागील निवडणुकीत भाजपने ज्याप्रमाणे काँग्रेसच्या तोंडातून सत्तेचा घास पळविला, त्यानंतर गोव्यासह देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी काँग्रेला ‘हात’ दाखवत भाजपसह इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आणि अजुनही तो सुरुच आहे. मात्र, तरी देखील काँग्रेस भाजप विरूध्द कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. गोव्यात ममतांनी देखील याच मुद्द्यावरुन काँग्रेसवर टीका केली. त्या म्हणाल्या, काँग्रेसनेच मोदी आणि भाजपला देशात शक्तीशाली बनविले आहे. एकीकडे ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन भाजपला अनेक राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु इतके कमकुवत होऊनही काँग्रेसचा सूर मात्र अजूनही ‘एकला चलोरे चा च असल्याचे दिसत आहे’. खरेतर काँग्रेसने आताच पुढाकार घेऊन गोव्यासह पाच राज्यांत भाजपला काही ठिकाणी सत्तेतून खाली खेचण्याची तर काही ठिकाणी सत्तेपासून दूर ठेऊन दिल्लीतील मोदी सरकारला धक्का देण्याची हीच नामी संधी आहे. पण काँग्रेस आणि यांचे नेते तडजोड करण्यास अजूनही तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेस पक्ष स्वत:ची कार्यक्षमता विसरला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता TMC गोव्यात पाऊल ठेऊन काँग्रेसशिवाय इतर सर्व प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दीदी स्वत: गोव्यात तळ ठोकून आहेत. त्यांना गोव्यातील अनेक प्रादेशिक पक्षांचे नेते येऊन भेटत आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी पश्चिम बंगालनंतर आता गोव्यातील राजकारणात चमत्कार घडवून थेट दिल्लीत धडक मारणार का? आणि त्यांच्या या नव्या समीकरणाला गोव्यातील जनतेसह भाजप सोडल्यास इतर पक्ष आणि जनतेचा पाठींबा मिळेल का? याचे उत्तर गोव्यात सध्यातरी सकारात्मक दिसून येत आहे. राहिला प्रश्न काँग्रेसचा तर गोवा दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे सध्या ना काँग्रेसचे अध्यक्षपद आहे ना निर्णयक्षमता. ते आपली आई सोनिया गांधी यांच्या पदराआडून काँग्रेसचे राजकारण करताना दिसत आहे. गोव्यात भाजपाच्या विरोधात उभे असलेल्या सर्वपक्षांना एकत्रीत करण्यासाठी काँग्रेस पुढाकरही घेताना दिसत नाही. गोवा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हा बालिशपणा दिसून येत आहे. काँग्रेस पक्ष आपली शक्ती तर घालवून बसलेलाच आहे. त्याशिवाय काही तरी करून दाखविण्याची धमकही त्यांच्या दिसत नाही. मात्र TMC च्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची गोवा निवडणुकीचीजी तयारी दिसत आहे, त्या तुलनेत काँग्रेस खुप मागे पडलेली दिसत आहे. शिवाय राहुल गांधीही काही खास निर्णय घेतील असे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्या भेटीची शक्यता कमीच आहे. आता स्वत: राहुल गांधी गोव्यातील विरोधी पक्षांच्या भेटीगाटी घेण्यात कीती उत्सुक आहेत, ते येणाऱ्या दोन दिवसात समजेल. राहुल गांधी यांचा हा दौरा गोव्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारा असला तरी, भ्रष्टाचारी भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी मदतदार काँग्रेसवर खोटा विश्वास ठेवेल गोव्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला आहे.

Elections 2022 If TMC and Congress had met in Goa
CBIच्या कचाट्यात गोवण्याचा प्रयत्न झाला, पण पर्रीकर काँग्रेसला पुरुन उरले

जर भेट झाली असती तर...

राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांची भेट झाली तर गोव्यातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळेल. त्याचबरोबर राज्यसह देशातील राजकारणात मोठ्या हालचालींना वेग येईल. तेथील प्रादेशिक पक्ष देखील काँग्रेस आणि तृणमूल सोबत जावून भाजप विरूध्द सर्व पक्षीय अशी निवडणूक देखील गोव्यातील जनतेला पहायला मिळू शकते. गोवा फॉरवर्ड पक्षाने आता तृणमूल सोबत करार केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीचे चित्र बदलू शकते.

हे दोन पक्ष एकत्र आले तर येणाऱ्या काळात गोव्यातील राजकारण दिल्लीपर्यंत पोहचू शकते. काल पत्रकार परिषदेत याबाबत दीदींना विचारले असता त्यांनी यावर उत्तर देणे टाळले. मात्र, आज राहुल गांधी या विषयावर काही बोलतील का आणि बोलले तर या मुद्याला दुजोरा देतील का? हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com