...सर्वप्रथम गुदिन्हो यांनी आपल्या पदाची जाणीव ठेवावी: नारायण नाईक

कुठ्ठाळी भाजप मंडळ उमेदवार निश्चित करून त्याला निवडून आणण्यात सक्षम असल्याचे प्रतिपादन कुठ्ठाळी भाजप गटाध्यक्ष तथा सांकवाळचे पंच नारायण नाईक यांनी केले.
...सर्वप्रथम गुदिन्हो यांनी आपल्या पदाची जाणीव ठेवावी: नारायण नाईक

Goa Assembly elections

Dainik Gomantak

Goa Assembly Elections 2022: राज्य सरकार मध्ये शिष्टाचार मंत्रीपद सांभाळणारे माविन गुदिन्हो यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2022) कुठ्ठाळीचा भाजप (BJP) उमेदवार ठरविण्यापूर्वी, सर्वप्रथम गुदिन्हो यांनी आपण कोणते पद सांभाळत आहे याची जाणीव ठेवणे गरजेचे होते. कुठ्ठाळी भाजप मंडळ उमेदवार निश्चित करून त्याला निवडून आणण्यात सक्षम असल्याचे प्रतिपादन कुठ्ठाळी भाजप गटाध्यक्ष तथा सांकवाळचे पंच नारायण नाईक (Narayan Naik) यांनी केले.

Goa Assembly elections

माविन गुदिन्हो यांच्याहस्ते झुआरीनगर येथे पाणी पुरवठा वाहिनीचा शुभारंभ

गुदिन्हो (Minister Mauvin Godinho) यांनी एका व्यक्तीचे नाव कुठ्ठाळीत भाजप उमेदवार म्हणून घोषित करण्यापूर्वी सर्वप्रथम कुठ्ठाळी भाजप मंडळ, राज्य भाजप पदाधिकाऱ्या बरोबर चर्चा करणे महत्त्वाचे होते. तसे न करता जग जाहीर करणे एकदम चुकीचे आहे. एवढ्यावर न थांबता गुदिन्हो यांनी परप्रांतीय उमेदवार असे जाहीर करून एका प्रमाणे जातीयवाद करण्याचा प्रयत्न गुदिन्हो यांनी केला असल्याचा आरोप दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तसा सांकवाळचे पंच तुळशीदास नाईक (Tulshidas Naik) यांनी केले.

Goa Assembly elections

Vasco: नववर्षामुळे वास्को पालिका कार्यालयातील कर्मचारी सुट्टीवर; नागरिकांचा खोळंबा

दाबोळीचे (Dabolim) आमदार तथा राज्य सरकारमधील शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी एका केंद्रीय राज्य मंत्र्याच्या सभेत भाजपचा उमेदवार म्हणून एका व्यक्तीचे नाव जाहीर केले होते. मंत्री गुदिन्हो एवढ्यावरच न थांबता त्या उमेदवाराला परप्रांतीय असे म्हटले होते. गोव्यातील सर्व मतदार गोवा वासीय असून, आम्ही सर्व समाजाचे सन्मान करीत आहे. तसेच मंत्री गुदिन्हो याने बेजबाबदार वक्तव्य करण्यापूर्वी राज्य भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बंद दरवाज्यात बैठक घेऊन आपले मत मांडावे असा सल्ला कुठ्ठाळी भाजप मंडळाने शुक्रवार वास्कोत आयोजित पत्रकार परिषदेतून केला.

सदर पत्रकार परिषदेत दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तुळशीदास नाईक, कुठ्ठाळी भाजप गटाध्यक्ष नारायण नाईक, सरचिटणीस अच्युत नाईक, महिला मोर्चाच्या अध्यक्षा वर्षा पेडणेकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष अरविंद अक्की, सदस्य शिवानंद भिंगी, गोवा राज्य महिला खजिनदार अनिता रायकर उपस्थित होते. पुढे माहिती देताना गटाध्यक्ष नारायण नाईक म्हणाले की, भाजप उमेदवार कोण असावा हे ठरवण्यासाठी मंडळ सक्षम आहे. स्व. माथानी सरा बरोबर राहून आम्ही त्यांना प्रथम भाजपचा उमेदवार म्हणून निवडून आणले. नंतर श्रीमती एलिना साल्ढाणा (Alina Saldanha) यांना एकदा बिनविरोध तर दुसऱ्यांदा पुन्हा एकदा आमदार निवडून आणण्यात आम्ही सक्षम असल्याची माहिती नारायण नाईक यांनी दिली. शिष्टाचार मंत्री गुदिन्हो यांनी एका व्यक्तीचे नाव जाहीर करण्यापूर्वी कुठ्ठाळी भाजप मंडळ, राज्य भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. उगाच तोंडाला येणारे शब्द घेऊन आपली फजिती करून घेणे गुदिन्हो याने थांबवावे. मंत्री गुदिन्हो यांनी एका सभेत एका व्यक्तीचे नाव कुठ्ठाळी भाजप उमेदवार असे जाहीर केल्याचे मंडळाने राज्य भाजप पदाधिकाऱ्यांना कळवली असल्याची माहिती नारायण नाईक यांनी दिली. कुठ्ठाळी भाजप सरचिटणीस अच्युत नाईक यांनी सांगितले की, 'मंत्री गुदिन्हो हा आमचा आमदार नसून त्याने कुठ्ठाळीचा उमेदवार घोषित करणे एकदम चुकीचे आहे. कुठ्ठाळीत भाजप उमेदवाराला निवडून आणण्यात आमच्यात ताकद आहे', अशी माहिती नाईक यांनी दिली.

Goa Assembly elections

गोव्यातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1046 वर

दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तुळशीदास नाईक यांनी सांगितले की, 'शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी बेजबाबदार वक्तव्य करून बाहेरचा- आतला स्वतः सांगून, जातीयवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपला सर्वप्रथम देश नंतर पक्ष असल्याची माहिती तुळशीदास नाईक यांनी दिली. पाच वर्षांपूर्वी भाजपात असलेल्या मंत्र्यांनी पक्षाची नीती सर्वप्रथम जाणून घेणे गरजेचे होते आणि ते एका व्यक्तीचे नाव कुठ्ठाळीचा संभाव्य भाजप उमेदवार असे जाहीर करताना मंत्री गुदिन्हो यांनी तो उमेदवार परप्रांतीय असल्याचे सांगून जातीयवाद वक्तव्य केले असे असून त्याचे आम्ही खंडन करीत आहे. कुठ्ठाळीत परप्रांतीय असले तरी ते सर्वप्रथम भारतीय आहेत, याची जाणीव मंत्री गुदिन्हो यांनी ठेवावी. भारतीय संविधानात सर्वांना हक्क असून तो भारतात कुठेही वास्तव्य करू शकतो. उगाच गुदिन्हो यांने जातियवाद करण्याचा प्रयत्न करू नये.

Goa Assembly elections

माविन गुदिन्हो यांच्याहस्ते झुआरीनगर येथे पाणी पुरवठा वाहिनीचा शुभारंभ

ते पुढे म्हणाले की, 'भाजपच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर गुदिन्हो यांना मंत्रीपद दिले, त्याचा गैरफायदा गुदिन्हो यांनी घेऊ नये. येणारी गोवा विधानसभा निवडणुकीत राज्य भाजपचे २२ पेक्षा जास्त उमेदवार निवडून येणार यात कुठ्ठाळीचा भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याची माहिती तुळशीदास नाईक यांनी दिली. भाजपचा उमेदवार ठरवण्यासाठी मंडळाची बैठक लवकरच घेण्यात येईल अशीही माहिती नाईक यांनी दिली. तसेच राज्य भाजप कोणताही उमेदवार आम्हाला देईल त्या उमेदवाराला मंडळ सहकार्य करणार आहे', अशी माहिती शेवटी तुळशीदास नाईक यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com