... तर गोवा विधानसभा निवडणुका पुढे ढकला

वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त, गोव्यात राजकीय नेत्यांनी धरबंध सोडला; सभांना ऊत, हजारोंची उपस्थिती
Goa Assembly elections will postponed

Goa Assembly elections will postponed

Dainik Gomantak

पणजी: कोविडची तिसरी (Covid-19) लाट धडकली आणि ओमिक्रॉनचेही (Omicron) थैमान सुरू असताना प्रचाराच्या नावाने राजकीय (Goa Politics) पक्षांनी धरबंध सोडला आहे. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने बडगा उगारावा किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी केली. गोमन्तक टीव्हीच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात भाग घेताना कृती तज्ज्ञ समितीचे सदस्य बालरोगतज्ज्ञ डॉ.धनेश वळवईकर, जीएमसीच्या फॉरेन्सिक विभागाचे सहयोगी प्रा.डॉ.मधू घोडकिरेकर यांनी पक्षांवर निर्बंध लागू होण्याची आवश्यकता व्यक्त केली.

‘सरकार लोकांना कोविडचे नियम पाळायला लावते. कोविड पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांनी वाढल्यानंतर विविध नियमावली लागू झाली आहेत. परंतू, ती राजकीय पक्षाने मात्र पाळण्यास नकार दिला आहे. ज्या पद्धतीने हजारोंच्या सभा घेण्याचे सत्र सुरू झाले आहे, ते चिंताजनक आहे. राज्य सरकारने त्यावर निर्बंध लागून केल्यास निवडणूक आयोगाने ताबडतोब हस्तक्षेप करावा. संपूर्ण निवडणूक यंत्रणेवर निर्बंधांची आवश्यकता आहे आणि प्रचार मोहिमेवर तर कडक नियंत्रण लागू झाले पाहिजे’, अशी मागणी डॉ. धनेश वळवईकर यांनी केली.

<div class="paragraphs"><p>Goa Assembly elections will postponed</p></div>
...म्हणून गोवा विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी: जुझे फिलिप डिसोझा

कोविड कृती दलाचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी तर निवडणूक आयोगाने ताबडतोब राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक बोलावण्याची मागणी केली. ‘राज्यातील निवडणूक आयोगाच्या शाखेने अधिक कृतिशील बनून आता तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक बोलावण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कोविड रोखण्याचे काम केवळ डॉक्टरांवर सोपवणार आहे का?’ असा प्रश्न त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, राजकीय पक्षांवर प्रचारासंबंधात बंधने येण्याची तीव्र आवश्यकता आहे. सरकार या प्रश्नात निर्बंध लागू करणे कठीण आहे. परंतु निवडणूक आयोग सर्वच राजकीय पक्षांना समान बंधनांमध्ये बांधून घेऊ शकते. निवडणूक आयोगाकडून तत्काळ नवे नियम जाहीर होण्याची आवश्यकता आहे आणि राजकीय पक्षांनी त्यांचे कठोरपणे पालन करायला हवे. डॉ. मधू घोडकिरेकर म्हणाले, सरकारी यंत्रणा ही लाट झेलण्यासाठी किती सक्षम आहे या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीच्या कामामध्येही आम्हाला शोधावे लागेल. बरेचसे अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कार्यात गुंतवले जाणार आहेत. त्यामुळे कोविडप्रश्नी कर्मचाऱ्यांचा तुटवडाही भासू शकतो. म्हणून कोविडची तिसरी लाट अधिक फैलावरणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे आणि निवडणूक प्रचारावर निर्बंध येणे आवश्यक बनले आहे.

भाजपकडून मोठ्या सभा रद्द

तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन भाजपने बुधवारपासून आपल्या जाहीर सभांवर नियंत्रण लागू केले. भाजपने10 जानेवारीपर्यंत आणखी 13 सभा घेण्याचे उद्दिष्ट्य बाळगले होते. परंतू, यापुढे मोठ्या सभा रद्द केल्याची माहिती ‘सुकाणू’ समितीच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘गोमन्तक’ला दिली. बुधवारी शेवटची मोठी सभा वास्को येथे दाजी साळकर यांच्या समर्थनार्थ घेण्यात आली.

नवे तब्बल 1002 रुग्ण!

राज्यातील कोविड व ओमिक्रॉनबाधित नव्याने आढळून येत आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये एकूण 5663 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल 1002 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शिवाय कोरोनामुळे एकाचा मृत्यूही झाला.तर ओमिक्रॉनच्या आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या 19 झाली आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Assembly elections will postponed</p></div>
महेश आमोणकरांची प्रकृती खालावली; कब्रस्थानसाठी आंदोलन सुरुच !

असाच प्रचारांचा बार उडत राहिला तर पुढच्या दहा दिवसात कोविड संख्या दुप्पट होण्यास वेळ लागणार नाही. आचारसंहितेपूर्वी स्वतःचे राजकीय उखळ पांढरे करण्यासाठी पक्षांनी धरबंध सोडला आहे. त्यांच्यावर कडक निर्बंधाची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी केवळ डिजीटल प्रचाराची नवी पद्धत निवडणूक आयोगाने आखून द्यावी.

- डॉ. विनायक बुवाजी, अध्यक्ष, गोवा विभाग भारतीय वैद्यक संघटना

गुरुवारी काँग्रेस पक्षाने कोविडसंदर्भात निर्बंधाबाबत निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता निवडणूक पुढे ढकलण्याच्या मागणीसंदर्भातही उद्याच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. आम्ही घरोघरी फिरताना कमीत कमी कार्यकर्त्यांना घेऊन जाण्याचे निश्चित केले आहे.

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com