पर्येत विश्वजीत राणे यांनी कमळ सोडून धरला झाडू

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी करणार आप पक्षात प्रवेश, पाच हजार कार्यकर्ते असणार बरोबर
पर्येत विश्वजीत राणे यांनी कमळ सोडून धरला झाडू
पत्रकार परिषदेत बोलताना विश्वजीत कृष्णाराव राणेDainik Gomantak

पिसुर्ले: पर्ये मतदार गेल्या दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे (BJP) कार्य करणारे आणि सन 2012 व 2017 साली भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सालेली येथिल काजू कारखाना उद्योजक विश्वजीत कृष्णाराव राणे हे सुमारे 5 हजार भाजप कार्यकर्त्यांना (workers) घेऊन दि. 16 रोजी सायंकाळी सहा वाजता आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा आज रविवारी होंडा येथिल कमल रेस्टॉरंट मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.

यावेळी विश्वजीत कृष्णाराव राणे यांनी आपल्या प्रदेशाचे समर्थन करताना सांगितले की आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या हे IIT शिक्षीत असल्याने त्यांच्या कडे विकासाचे व्हिजन आहे, त्यामुळे त्यांच्याने दिल्लीचा कायापालट केला आहे. परंतु गेल्या पन्नास वर्षांपासून पर्ये मतदार संघातील नेते 17 वर्षे मुख्यमंत्री होते आणि अजून राजकारणात आहे, मात्र या काळात हवा तसा विकास पर्ये मतदार संघात झाला नाही, त्याच प्रमाणे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे, त्यांना नोकरीत हवे तसे प्राधान्य मिळत नाही.

गेल्या कित्येक वर्षांपासून पर्ये मतदार संघात राज्य कर्त्याकडून अद्याप मतदार संघातील (Constituency) पाण्याचा प्रश्न सुटला नाही, त्यामुळे आज 80 टक्के गांवात टॅक्कर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मतदार संघात अंजूणे धरण असुन सुद्धा मतदारांना व खुद्द धरणग्रस्तांना सुद्धा पाणी मिळत नाही. या विषयी विविध समस्यांबाबत त्यांनी विद्यमान आमदारांचे नाव न घेता पाडा वाचला.

त्याच प्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सध्याच्या नेतृत्वा विषयी नारजी व्यक्त करताना राणे यांनी सांगितले की या पक्षाची धुरा स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या कडे होती तेव्हा कार्यकर्त्यांना मान तसेच सर्वांना विश्वासात घेतले जात होते, परंतू ते नसल्यापासून मतदार संघातील जेष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे पक्षातील सर्व बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन भाजप पक्ष सोडून विकासाचे व्हिजन असलेल्या आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझ्या सोबत भाजप व इतर मिळून सुमारे पाच हजार कार्यकर्ते येत्या मंगळवारी सालेली येथे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वजीत कृष्णाराव राणे यांनी शेवटी दिली.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या पर्ये मतदार संघातील पुर्व श्रमीचे भाजप कार्यकर्त्ये अॅड गणपत गावकर यांनी आप पक्षात प्रवेश केला आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आप पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार असा प्रश्न विचारला असता, सांगितले की या संबंधीची घोषणा खुद्द पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हेच मंगळवारी करणार असल्याचे सांगितले. आपण व अॅड गणपत गावकर हे एकच असल्याचे खुलासा केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com