विकासकामाच्या बळावर निवडणूक जिंकणार

केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामाच्या बळावर विधानसभेची निवडणूक भाजप जिंकायची असून सध्या भाजपकडे 27 आमदार आहेत.
विकासकामाच्या बळावर निवडणूक जिंकणार
Goa CM Pramod Sawant Said will win election on strength of development work Dainik Gomantak

पणजी: केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामाच्या बळावर विधानसभेची निवडणूक भाजप जिंकायची असून सध्या भाजपकडे 27 आमदार आहेत. त्यामध्ये आणखी वाढ कशी होईल, यासाठी सक्रियपणे पुढील दोन महिने काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पणजी येथे आयोजित बूथ चलो अभियान- विस्तारक कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या भाजपाच्या मंडळ कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपाध्यक्ष कुंदा चोडणकर, सरचिटणीस दामू नाईक, सरचिटणीस नरेंद्र सावईकर, संघटन मंत्री सतीश धोंड होते.

Goa CM Pramod Sawant Said will win election on strength of development work
शाळा सुरू करताना घाई नको : सार्दीन

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, भाजपाने नेहमीच लोकांच्या हिताचा विचार केलेला आहे. भाजपचे कार्यकर्ते अनुभवी आहेत. त्यांनी लोकापर्यंत जाऊन गोवा सरकारच्या विविध विकास कामांची माहिती लोकांना द्यायला हवी. कोरोना नियंत्रणाचे काम, स्वयंपूर्ण गोवा काम लोकांपर्यंत पोहचणे महत्वाचे आहे . केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले भाजप हा एकमेव कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इतर पक्ष हे कुटुंबाचे पक्ष आहेत. भाजपा मध्येच कार्यकर्ता बडा नेता बनू शकतो. इतर पक्षांमध्ये ते अशक्य असल्याचे सांगून भाजप साठी काम करणे देश सेवेचे काम आहे

Goa CM Pramod Sawant Said will win election on strength of development work
कर्मचारी भरतीचा आदेश मागे! काँग्रेसच्या आरोपानंतर गोवा सरकारला आली जाग

21 ते 30 नोव्हेंबर बूथ संपर्क

पक्षाचे बूथ विस्तारक 21 ते 30 नोव्हेंबर या काळामध्ये प्रत्येक बूथवर जाणार असून बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या कडून सतत संपर्क ठेवून स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com