शेतकरीविरोधी कायदे संसदेमध्येही मागे घ्या: गोवा काँग्रेस

केंद्र सरकारने (Central Government) वर्षभरापूर्वी लागू केलेले शेतकऱ्यांसंबंधीचे कायदे माघारी घेतले असले तरी याची वैधानिकता पूर्ण करण्यासाठी ते संसदेमध्ये मागे घ्या.
Goa congress demands to taking repeal farm laws in parliament
Goa congress demands to taking repeal farm laws in parliament Dainik Gomantak

पणजी : केंद्र सरकारने (Central Government) वर्षभरापूर्वी लागू केलेले शेतकऱ्यांसंबंधीचे कायदे माघारी घेतले असले तरी याची वैधानिकता पूर्ण करण्यासाठी ते संसदेमध्ये मागे घ्या, अशी मागणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर व महिला काँग्रेस अध्‍यक्षा बीना नाईक उपस्‍थित होत्‍या.

रेजिनाल्ड पुढे म्हणाले, तेरा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने लागू केलेले कायदे अखेर केंद्र सरकारला माघारी घ्यावे लागणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. पूर्ण देशभरातील शेतकरी या कायद्याविरोधात आंदोलन करत उभा आहे. आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे काय, हा प्रश्न आजही कायम आहे. किमान आधारभूत किमतीबाबत केंद्र सरकार स्पष्ट नाही.

ज्या शेतकऱ्यांनी या आंदोलनात आपला जीव गमावला, त्यांच्या कुटुंबांना सहानुभूती साहाय्‍य मिळणार का? काँग्रेस पक्ष या कायद्याविरोधात सुरुवातीपासून लढत राहिला, आंदोलन करत राहिला. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला समृद्ध करण्याबरोबर शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी काँग्रेस सातत्याने पुढे असून यापुढेही शेतकऱ्यांच्या बाजूने पक्ष उभा राहील, असेही ते म्हणाले.

Goa congress demands to taking repeal farm laws in parliament
चर्चिल आलेमाव यांची तृणमूल प्रवेशासाठी बाणावलीत चाचपणी

मुख्यमंत्री, भाजपमध्‍ये गोंधळाची स्‍थिती

केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधात कायदे केल्यानंतर भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचे समर्थन करत पंतप्रधानांचे अभिनंदन केले होते. आणि आता हे कायदे माघारी घेतल्यानंतरही भाजपवाले तसेच मुख्यमंत्री पंतप्रधानांचे अभिनंदन करत आहेत. यावरून त्यांची मानसिक स्थिती गोंधळलेली आहे हे स्पष्ट होत आहे. हा पक्ष जनहितविरोधी असल्‍याचे आता लोकांना कळून चुकले आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com