Goa Election 2022: भाजपला 12 ठिकाणी बंडखोरी रोखण्यात यश

निवडणुकीत 12 जागांवरील बंडखोरी रोखण्यात यश आले असून जिंकण्याची क्षमता असणाऱ्या सहा जणांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे.
BJP
BJPDainik Gomantak

पणजी: उत्पल पर्रीकर आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी घेतलेली भूमिका भारतीय जनता पक्षासाठी क्लेशदायक आहे. त्यांचे निर्णय आत्मघातीच मानावे लागतील. कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून त्यांना विविध पर्याय देण्यासाठी पक्ष प्रयत्नशील होता. मात्र, ते स्वत:हून बाहेर गेल्याने पक्षाने त्यांचा विचार सोडून दिला आहे अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

BJP
'आप'चे सरकार स्थापन झाल्यास 24 तासांत भ्रष्टाचार संपवणार: पालेकर

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला (BJP) राज्यातल्या अनेक मतदारसंघांमधून बंडखोरीचा मोठा तडाखा बसणार, हे आधीच माहिती होते. यासाठी पक्ष गेल्या वर्षभरापासून काटेकोर पद्धतीने आखणी करत आहे. आतापर्यंत भाजपने पेडणे, डिचोली, म्हापसा, कळंगुट, साळगाव, सांताक्रुझ, कुंभारजुवे, मये, प्रियोळ, फोंडा, वास्को, नावेली या 12 ठिकाणची बंडखोरी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न केले आणि यात पक्षाला यश आले. यासाठी पक्षाचे केंद्रीय नेते, केंद्रीय मंत्री अमित शहा गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता पक्षातर्फे काणकोण, सावर्डे, आणि सांगे या ठिकाणची बंडखोरी रोखण्यासाठी पुढील दोन दिवसांत जिकिरीचे प्रयत्न केले जाणार आहेत. काणकोणात भाजपचे 2017 चे उमेदवार विजय पै खोत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. तर सावर्डे येथे माजी मंत्री दीपक पाऊसकर यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. सांगे मतदारसंघातून सुभाष फळदेसाई यांच्या विरोधात महिला मोर्चाच्या सावित्री कवळेकर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे या तीन मतदारसंघांमध्ये सध्या भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. या तिन्ही जागांसाठी पक्षाने विशेष मोहीम राबवली असून या तिघांना माघार घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. असे असताना मांद्रे आणि पणजी या ठिकाणची बंडखोरी रोखण्याचा विचार पक्षाने सोडून दिला आहे.

BJP
Goa Assembly Election: 40 मंतदारसंघांसाठी 587 उमेदवारी अर्ज दाखल

कार्यकर्ते पुन्हा सक्रिय

सांताक्रुझ येथून अनिल होबळे आणि गिरीष उसकैकर नाराज होते. समजूत घातल्यामुळे पक्षातर्फे ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. बंडखोरीचा सर्वांत मोठा फटका कुंभारजुवे मतदारसंघाला बसणार होता. मात्र, तेथील सिद्धेश नाईक यांना वेगळ्या मतदारसंघाची जबाबदारी देऊन पक्षकार्यात सक्रिय केले आहे. याशिवाय फोंडा येथील संदीप खांडेपारकर आणि नावेली येथील सत्यविजय नाईक हेही पक्षासोबत उभे राहिले आहेत.

भाजपची रणनीती

निवडणुकीत 12 जागांवरील बंडखोरी रोखण्यात यश आले असून जिंकण्याची क्षमता असणाऱ्या सहा जणांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. या यशस्वी मोहिमेनंतर आता भाजपतर्फे मिशन काणकोण, सावर्डे आणि सांगे राबवण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत गोव्यात (Goa) पुन्हा सत्ता मिळवायचीच यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.

BJP
भाजपने भंडारी नेत्यांना अडगळीत टाकले : मायकल लोबो

यशस्वी शिष्टाई

पेडणे मतदारसंघात प्रवीण आर्लेकर पक्षात आल्याने पक्ष कार्यकर्ते नाराज होते. शिवाय आजगावकर यांना मानणारा गटही सक्रिय होता. तो आता पक्षाच्या बाजूने उभा करण्यात आला आहे. डिचोली मतदारसंघात शिल्पा नाईक उमेदवारीसाठी आग्रही होत्या. त्यांचे मन वळवण्यात पक्ष यशस्वी झाला आहे. शिवाय मये आणि वास्को येथील कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षामध्ये सक्रिय करण्यात भाजप यशस्वी झाला आहे.

परूळेकरांचे बंड शमले

म्हापसा (Mapusa) मतदारसंघ जोशुआ डिसोझा यांच्याविरोधात वातावरण असताना पक्षातील अनेक कार्यकर्ते पक्षविरोधात उभारले होते. तेही आता पक्ष कार्यात सक्रिय झाले आहेत. कळंगुट मतदारसंघात गुरुदास शिरोडकर उमेदवारीचे हक्कदार असताना तिथे उमेदवार बदलूनही शिरोडकर सध्या पक्षाबरोबर आहेत. साळगाव मतदारसंघात दिलीप परूळेकर उमेदवारीचे हक्कदार असताना त्यांनीही माघार घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com