Bjp
BjpDainik Gomantak

'या' दोन ख्रिश्चनबहुल मतदारसंघामधून भाजपची माघार!

'बाणावली' (Benaulim) आणि 'नुवे' (Nuvem) या दोन विधानसभा मतदारसंघात पक्ष आपल्या निवडणूक चिन्हावर कोणताही उमेदवार उभा करणार नाही.

देशात आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात गोवा राज्याचाही समावेश आहे. किनारपट्टीवरील या राज्यात पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी भाजप (Bjp) मतदारांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधत आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवली आहे. राजकीय नेते प्रचारसभा घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

याच पाश्वभूमीवर गोव्यातील सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने (BJP) पुढील महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) 40 पैकी 38 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, 'बाणावली' (Benaulim) आणि 'नुवे' (Nuvem) या दोन विधानसभा मतदारसंघात पक्ष आपल्या निवडणूक चिन्हावर कोणताही उमेदवार उभा करणार नाही.

Bjp
TMC: गोव्यात भाजपसमोर विरोधकांची मोट!

दरम्यान, बाणावली आणि नुवे विधानसभा मतदारसंघातील लोक पारंपारिकपणे गैर-भाजप उमेदवारांना मतदान करतात. या दोन्ही ख्रिश्चन बहुसंख्य जागा आहेत. बेनालिम मतदारसंघाचे सध्या चर्चिल आलेमाओ यांनी प्रतिनिधित्व केले आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) तिकिटावर निवडणूक जिंकल्यानंतर गेल्या महिन्यात ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले.

16 जानेवारीनंतर उमेदवारांची औपचारिक घोषणा केली जाईल

त्याच वेळी, नुवेमचे प्रतिनिधित्व विल्फ्रेड डीसा करतात, ज्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मागील निवडणूक जिंकली होती परंतु नंतर ते भाजपमध्ये सामील झाले होते. उमेदवारांची औपचारिक घोषणा 16 जानेवारीनंतर केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. पक्षाचे संसदीय मंडळ या यादीला कधी मान्यता देईल.'' उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी भाजप आपल्या कोअर कमिटीच्या बैठका घेत आहे.

Bjp
Michael Lobo: लोबोंच्या पक्षत्यागामुळे भाजपवर काडीचाही परिणाम होणार नाही

भाजप हायकमांड प्रमुख नेत्यांची बैठक घेणार

गोवा निवडणुकीसाठी पक्षाचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत आदी उपस्थित होते. भाजपचे पदाधिकारी 15 जानेवारीला दिल्लीला जाऊन वरिष्ठ नेत्यांची बैठक घेणार असल्याचे सावंत यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांना सांगितले. तर पक्षाचे संसदीय मंडळ दुसऱ्या दिवशी उमेदवारांची नावे निश्चित करणार आहेत.

गोव्यात भाजपच्या चार आमदारांनी राजीनामा दिला

मायकेल लोबो (Michael lobo), अलिना साल्दान्हा, कार्लोस आल्मेडा आणि प्रवीण जंते यांनी पक्ष आणि विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे भाजप सध्या 23 आमदारांसह गोव्यात राज्य करत आहे. भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त, TMC आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीसह इतर अनेक पक्ष 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com