Goa Election 2022: वास्कोत 16 ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिकासाठी दाखल

गोवा विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहेत
Goa Election 2022: वास्कोत 16 ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिकासाठी दाखल
Goa Election 2022: EVM in Vasco for peoples trail Dainik Gomantak

गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) जय्यत तयारी सुरू असून निवडणूक अधिकारी तसेच निर्वाचन अधिकारी आपापल्या कामाला लागले आहेत. निवडणुकीची तयारी म्हणून वास्कोत (Vasco) मामलेदार कार्यालयात प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ईव्हीएम मशीन (EVM) आणण्यात आली आहे.मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातील जनतेसाठी सदर ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्याची प्रात्यक्षिके दाखविली जाईल.त्यासाठी एकूण 16 ईव्हीएम मशीन आणण्यात आली आहे.(Goa Election 2022: EVM in Vasco for peoples trail)

गोवा विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहेत. त्यासाठी निर्वाचन अधिकारी उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग आप आपल्या कामाला लागले आहेत.तसेच त्यासाठीची निवडणुक यंत्रणांची सारवासारव चालू आहे.सरकारी कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने नागरिकांच्या इतर कामावर थोडाफार परिणाम होत आहे.दरम्यान मसुदा मतदार याद्या 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सर्व तालुक्यातील संबंधित मतदान केंद्र, संबंधित निर्वाचन अधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात छाननीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच मतदार यादी www.ceogoa.nic.in या वेबसायटवर उपलब्ध आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 20 आणि 21 नोव्हेंबर आणि 27 आणि 28 नोव्हेंबर 2021 रोजी म्हणजे शनिवारआणि रविवारी विशेष मोहीम आयोजित केली होती.

बीएलओ सर्व मतदान केंद्रांवर मतदार यादी आणि आवश्यक अर्जासह सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतील. सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषत: राजकीय पक्षांना विनंती करण्यात आहे की त्यांनी सदर मतदार याद्यांची छाननी करावी आणि नावे समाविष्ट, वगळणे किंवा दुरुस्त करण्यासाठी आवश्यक अर्ज भरून द्यावे. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष मतदार यादी उजळणी कार्यक्रम झाला. राज्यांमध्ये विशेष मोहीम सुरू करून विशेषत:18-19वयोगटातील पात्र तरुण मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यात येईल. मसुदा मतदार याद्या 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सर्व तालुक्यातील संबंधित मतदान केंद्र, संबंधित निर्वाचन अधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात छाननीसाठी उपलब्ध आहेत. तसेच मतदार यादी www.ceogca.nic.in या वेबसायटवर उपलब्धआहे. नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी www.nvsp.in या पोर्टलवर ऑनलायन ई-सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लोकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Goa Election 2022: EVM in Vasco for peoples trail
विधानसभेला भाजपचा ‘प्लस 22’चा नारा

दरम्यान मतदारांना मतदान करण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ईव्हीएम मशीन वितरीत करण्यात आली आहे.त्यानुसार मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातील जनतेसाठी सदर ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ईव्हीएम मशीन आणण्यात आली आहे.मुरगाव तालुक्यात प्रत्येक मतदारसंघात चार ईव्हीएम मशीन अशी मिळून एकूण 16 ईव्हीएम मशीन आणण्यात आली आहे.सदर मशीन प्रत्येक मतदारसंघात नेऊन लोकांना प्रात्यक्षिके दाखविली जाईल.सदर प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आलेल्या माणसाची तरतूद प्रत्येक मतदारसंघात करण्यात आली आहे.दरम्यान मुरगाव मामलेदार कार्यालयात प्रात्यक्षिके दाखविली जात असून याचा फायदा येथे आपल्या वैयक्तिक कामासाठी येणारे लोक घेत आहे.याकामी मुरगाव संयुक्त मामलेदार 2 जेनिफर फर्नांडीस ई आरेझ, निवडणूक कारकून दिपेश देवशेकर, बीएलओ व इतर कर्मचारी सहकार्य करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com