Goa Election 2022: आमदारांच्या जोडणीसाठी आतापासूनच लॉबिंग सुरू

लॉबिंग करण्याची जबाबदारी यावेळी विश्वजीत राणे आणि बाबुश मोन्सरात यांनी घेतली आहे.
 BJP VS Congress
BJP VS CongressDainik Gomantak

मडगाव: 2017 मध्ये काँग्रेसकडे 17 आमदार असतानाही भाजपने बाहेरच्या बाहेर लॉबिंग करून आपले 13 आमदार असतानाही सरकार घडविले होते. मागच्यावेळी हे लॉबिंग करण्यात स्व. मनोहर पर्रीकर यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी ती जबाबदारी विश्वजीत राणे व बाबुश मोन्सरात यांनी प्रामुख्याने घेतली आहे.

 BJP VS Congress
सासष्टीत 13 वर्षीय मुलीचे अपहरण

यावेळी भाजपची गाडी 14 पर्यंतच अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात असून काँग्रेसही 16 च्यावर जाणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंचे नेते फोडाफोडीच्या राजकारणात सक्रिय होऊ शकतात असे सांगितले जाते.

सध्या भाजपच्या बाजूने विश्वजीत राणे व बाबुश मोन्सरात यांनी अन्य पक्षातील संभाव्य आमदारांशी संपर्क साधणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व माविन गुदिन्हो यांनीही काही संभाव्य विजेत्यांशी संपर्क साधला असून ते दोघे काँग्रेसच्याही आमदारांना फोडू पहात असल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

 BJP VS Congress
Goa Carnival Festival 2022: रोषणाईने नटली पणजी

काँग्रेससाठी लोबोंचा पुढाकार

दुसऱ्या बाजूने काँग्रेसकडूनही हे प्रयत्न सुरू असून मायकल लोबो यांनी त्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंबंधी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना विचारले असता, भाजपच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com