Goa Election 2022: गोव्यात TMC आणि AAP प्रवेशावरून ट्विस्ट वाले ट्विट

विशेष म्हणजे गोव्यातील 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी झालेले 50 टक्के आमदार त्यांच्या पक्षात नाहीत. त्यांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे लुइझिन फालेरो आणि एक आमदार टीएमसीमध्ये गेले आहेत.
Goa Election 2022
Goa Election 2022Dainik Gomantak

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) तारखा काल जाहीर झाल्या. मात्र तारखा जाहीर होण्यापूर्वीच गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोव्याचे राजकारण ज्या पद्धतीने सतत बदलत आहे, ते मतदारांसाठी खूपच मनोरंजक होत आहे.

खरे तर गोव्यात नेहमीप्रमाणे भाजप आणि काँग्रेसमध्येच (Congress)चुरशीची लढत होईल, असे सुरुवातीला वाटत होते. काँग्रेसनेही युती करण्यास सुरुवात केली होती. काँग्रेसने गोव्याच्या प्रादेशिक पक्ष गोवा फॉरवर्डशी (Goa Forward) युती करण्याची घोषणाही केली होती पण गोव्याच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसच्या प्रवेशाने सगळेच समिकरणं बदलले आहे. यासोबतच आम आदमी (AAP) पक्षही यावेळी पुन्हा गोव्यात नशीब आजमावत आहे. गेल्या निवडणुकीतही त्यांनी प्रयत्न केले होते, पण काही उपयोग झाला नाही. दुसरीकडे, गोव्यातील युतीच्या प्रश्नावर पी. चिदंबरम यांनी टीएमसीकडून (TMC) युतीसाठी काय ऑफर आहे हे बघूया असे मत व्यक्त केल्याने गोव्यातील राजकीय परिस्थितीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.

मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या, परंतु भाजपने गोवा फॉरवर्ड आणि दुसरा प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक (MGP)पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले. पर्रीकर गेल्यानंतर प्रमोद सावंत यांचे सरकार स्थापन झाले. त्यांनी काँग्रेस फोडली आणि काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये दाखल झाले. निवडणुकीनंतर भाजपचा जो आकडा 13 होता, तो काँग्रेसच्या आमदारांच्या आगमनानंतर 25 वर पोहोचला. यानंतर गोव्यात भाजपचे (BJP) पूर्ण बहुमताने सरकार स्थापन झाले. यानंतर गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सरकारमधून बाहेर फेकले गेले. तेव्हापासून हे दोन्ही पक्ष गोव्यात नवीन युती करण्यात मग्न होते.

विशेष म्हणजे गोव्यातील 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी झालेले 50 टक्के आमदार त्यांच्या पक्षात नाहीत. त्यांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे लुइझिन फालेरो आणि एक आमदार टीएमसीमध्ये गेले आहेत. काँग्रेसचे आणखी एक आमदार रवी नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे जुने आमदार असलेले प्रतापसिंह राणे यावेळी निवडणूक लढवणार नाहीत. राणेंचा मुलगा भाजपमध्ये असून ते आरोग्यमंत्री म्हणून भाजप सरकारमध्ये कार्यरत आहे.

Goa Election 2022
Goa Election 2022: निवडणुकीचं बिगूल अखेर वाजलं, 14 फेब्रुवारीला मतदान

माजी मुख्यमंत्री टीएमसीमध्ये दाखल

टीएमसीने निवडणुकीपूर्वी आपली खेळी दाखवायला सुरुवात केली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांना पक्षात सामील करून घेतले. यानंतर टीएमसीकडून सांगण्यात आले की, पश्चिम बंगालनंतर प्रथमच आम्ही गोव्याला जात आहोत आणि तिथे नशीब आजमावू पाहत आहोत. तृणमूल गोव्यात काँग्रेसची जागा घेणार अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. टीएमसीचे निवडणूक रणनीतीकार असलेले प्रशांत किशोर काँग्रेस आणि टीएमसीची युती करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे मित्रपक्ष गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी एक ट्विट केले आहे. भाजपच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावे, असे त्यांनी त्यामध्ये लिहिले आहे. यानंतर गोवा तृणमूल काँग्रेसच्या प्रभारी महुआ मोईत्रा यांनी भाजपशी युती केल्यास आम्हाला काँग्रेसशी बोलण्यास काहीच हरकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे काँग्रेसचे म्हणणे आहे की तुम्ही (प्रशांत किशोर) आमचे नुकसान केले आणि आता टीएमसीने आमच्याशी युती केली तर ते योग्य नाही.

काँग्रेस आणि आपमध्ये अंतर्गत समझोता झाल्याचीही चर्चा

काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये अंतर्गत समझोता झाल्याची चर्चा गोव्यात आहे. दोन्ही पक्ष एकमेकांशी युती करत नसले तरी गेल्या पाच वर्षांत गोव्यात आम आदमी पक्षाची स्थिती सुधारली आहे. निवडणुकीनंतर गरज पडल्यास काँग्रेस आणि आप एकत्र येऊ शकतात. आम आदमी पक्षाला प्रशांत किशोर यांची मदत घ्यायची नाही. काँग्रेसला प्रशांत किशोरसोबत जायचे नाही, टीएमसीसोबत जायचे नाही. अशा स्थितीत काँग्रेस आणि आपची युती होण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण ते सध्या तरी शक्य होताना दिसत नाही. तूर्तास गोव्यातील राजकारणावर नजर टाकल्यास ही लढत अष्टपैलू होणार असल्याचे समजते आहे. एका बाजूला काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड असेल तर दुसरीकडे टीएमसी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष असतील, ज्यांची युती झाली आहे. भाजप तिसऱ्या बाजूला आणि आम आदमी पक्ष चौथ्या बाजूला असेल. त्यामुळे गोव्यात जोरदार चुरशीची लढत होणार आहे.

Goa Election 2022
Goa Assembly Election: गोव्यात TMC अन् AAP च्या एन्ट्रीने 'खेला होबे'

आता प्रादेशिक पक्षासोबत युती केल्यानंतर टीएमसीचा मताधिक्य किती असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. काँग्रेस आपली विश्वासार्हता वाचवू शकेल की नाही? कारण गेल्या निवडणुकीत पर्रीकरांच्या मुक्कामात काँग्रेसने भाजपपेक्षा जास्त जागा आणल्या होत्या. पर्रीकर यांच्याशिवाय भाजप काय करू शकते हे पाहणेही रंजक ठरणार आहे, कारण पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपची ही पहिलीच निवडणूक असल्याने यातून पर्रीकरांचे महत्त्वही दिसून येईल. गोव्याची निवडणूक आम आदमी पक्षासाठीही रंजक असेल, कारण चंदीगडच्या नागरी निवडणुकीत आम आदमी पक्षाचा निकाल चांगला लागला आहे. गोव्यातही गेल्या पाच वर्षांत आपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी चांगले काम केले आहे. तेव्हा येणारा काळा आपल्याला गोव्यातील निवडणुकीचे रंजक चित्रे दाखवणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com