गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची युती झाली की नाही

राहुल गांधी यांच्यासमवेत गोवा फॉरवर्ड (Goa Forward) आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे हातात हात मिळवून ‘जितंम्’ या थाटाचे छायाचित्रही (Photo) गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी ट्विट (Twitter) केले.
गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची युती झाली की नाही
गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची युती झाली की नाही Twitter@Goa Forward

काँग्रेसने (Congress) बराच विलंब लावत गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पक्षासोबत युतीची घोषणा केल्याची बातमी मंगळवारी पसरली. राहुल गांधी यांच्यासमवेत गोवा फॉरवर्ड (Goa Forward) आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे हातात हात मिळवून ‘जितंम्’ या थाटाचे छायाचित्रही (Photo) गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी ट्विट (Twitter) केले. त्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि दिनेश गुंडू राव यांच्यासोबत शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर, अपक्ष आमदार प्रसाद गावकर आणि अर्थातच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत दिसतात.

गोवा फॉरवर्डसोबत (Goa Forward) युती नको, असे आडवाटेने सातत्याने सुचवणारे काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष व राहुल गांधी यांच्या खास विश्वासातले असे वर्णन केले जाणारे गिरीश चोडणकर या छायाचित्रात नाहीत. काँग्रेसला (Congress) निवडणुकीसाठी सज्ज करण्यासाठी गठित झालेल्या कोणत्याही समितीचा प्रभारी येथे दिसत नाही. स्थानिक नेतृत्वाला अंधारात ठेवून दिगंबर आणि राव यांनी ही चाल खेळली असल्याच्या संशयाला बराच वाव आहे आणि काँग्रेसच्या (Congress) बऱ्याच स्थानिक नेत्यांची देहबोली तेच दर्शवते आहे. यामुळे पसरलेल्या संशयाचे निराकरण व्हायच्या आधीच दिनेश गुंडू राव यानी भलतेच विधान केले आहे. त्यांच्या मते युती अद्यापही झालेली नाही, तर गोवा फॉरवर्डने काँग्रेसला केवळ पाठिंबा दिलेला आहे. राजकारण गढूळ करून टाकणारे हे विधान आहे.

गोवा फॉरवर्ड (Goa Forward) निवडणुकीत उतरणार नसून केवळ काँग्रेसला (Congress) पाठिंबा तेवढा देणार असल्याचा अर्थ या वक्तव्‍यात अंतर्भूत आहे. काँग्रेसमध्ये (Congress) अचानक असे कोणते दिव्यत्व झिरपलेय की, अन्य पक्षांनी त्याला बिनशर्त पाठिंबा द्यावा? आजमितीस राज्य विधानसभेत काँग्रेसकडे पाच आमदार असतील, तर गोवा फॉरवर्डकडेही (Goa Forward) तीन आमदार आहेत. अशा पक्षाने निमूटपणे आपल्याला पाठिंबा द्यावा व आपले मांडलिकत्व पत्करावे, अशी अपेक्षा काँग्रेसचे दिनेश गुंडू राव हे करत असतील, तर तो फाजील आणि आत्मघाती आत्मविश्वास आहे, असेच म्हणावे लागेल. असे छक्क्यापंज्यांचे राजकारण खेळण्यापेक्षा काँग्रेसने स्वतंत्ररित्या निवडणुका (Election) लढण्यावर लक्ष केंद्रित करणेच योग्य ठरेल.

गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची युती झाली की नाही
गोव्यातील राष्ट्रवादी नेत्यांना पवारांनी दिला सल्ला

गोव्याच्या (Goa) राजकारणावर भारतीय जनता पक्षाचा एकछत्री अंमल असू नये, निवडणुकीत त्या पक्षावर प्रत्येक मतासाठी झुंज द्यायची वेळ यावी, अशी भूमिका आम्ही या स्तंभातून जाणिवपूर्वक घेत आलो आहोत. अशा संघर्षातून राजकीय पक्ष आणि संघटनांच्या ध्येयधोरणांना लोकानुवर्ती वळण मिळते. लोकशाही मुल्यांवरील त्यांचा विश्वास कळत- नकळत दृढ होतो. यातून एकाधिकारशाहीकडे वळू पाहणारी पावले थबकतात. म्हणूनच भाजपाला सक्षम विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसने समविचारी पक्षांसोबत युती करायला हवी, असे प्रतिपादन ‘गोमन्तक’ करत आला आहे. काँग्रेस (Congress) , राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) अणि गोवा फॉरवर्ड (Goa Forward) हे तीन पक्ष एकाच मुशीतले आहेत आणि वैयक्तिक हेवेदावे सोडून त्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यापक विचार केल्यास युती शक्य व साकार होऊ शकेल, असेही आमचे सांगणे होते.

या युतीला मगो पक्षाची सोबत मिळाल्यास सोन्याहून पिवळे होईल, पण, मगोपचा इतिहास गेल्या दीड दशकाच्या काळात निर्लज्ज सत्तानुनयाचा राहिला असल्याकारणाने तो पक्ष बेभरवशाचा बनतो. तशात मगोपचे पृथकपणे जाणे भाजपाच्या मतांना काही प्रमाणात छाट देणारे आहे आणि ते विरोधकांच्या पथ्यावर पडणारे आहे. शिवाय नेतृत्वाच्या लवचिकतेमुळे मगोप निवडणुकीपश्चातच्या (Election) तडजोडीसाठीही उपलब्ध होऊ शकतो. ‘गोमन्तक’ने सातत्याने सुचविलेल्या या राजकीय सामंजस्याचा पूर्वरंग काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड (Goa Forward) या दोन पक्षांच्या युतीतून दिसू लागला होता. पण, आता दिनेश राव यांनी जो अनवट सूर लावला आहे, तो पाहता काँग्रेसच्या (Congress) भ्रमाचा भोपळा फुटायलाच हवा, असे वाटू लागले आहे.

युती म्हटली की तिथे मनांची एकवाक्यता हवी. काँग्रेसला (Congress) जे अपेक्षित आहे, त्यातून मनोमिलन होईल, समविचारी मतदाराचे संघटन होईल, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. तृणमूल काँग्रेसच्या आगमनानंतर गोव्यातील राजकारणाचे आयाम झपाट्याने बदलू लागले आहेत, हे मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेससह(Congress) भाजपातील तिकिटेच्छुकांना हेरण्याचे काम त्या पक्षाच्या वतीने प्रशांत किशोर यांची ‘आयपॅक’ ही यंत्रणा आजही जोमाने करते आहे. जसजसे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारीचे चित्र स्पष्ट होत जाईल, तसतसे नवे मासे ‘आयपॅक’च्या आणि तृणमूलच्या गळाला लागतील. तृणमूल फक्त उमेदवारीच देणार नसून निवडणूक (Election)लढवण्यासाठी लागणारी शिदोरीही देईल, अशा प्रकारची हवा आज तयार झालेली असल्याने त्या पक्षाकडे अनेक उमेदवार पर्यायी व्यवस्था म्हणून पाहताहेत.

गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची युती झाली की नाही
निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांशी बैठक

तृणमूलला मिळणारी मते बव्हंशी काँग्रेसचीच असतील, हेदेखील स्पष्ट आहे. जर सासष्टीच्या किल्ल्यासाठी ही युती असेल तर तेथेच तृणमूलचा उपद्रव अधिक असेल, हेही लक्षात घ्यावे लागेल. लुइझिन फालेरो (Luizinho Faleiro) किंवा आता तृणमूलच्या गळाला गिळू पाहाणारे चर्चिल आलेमाव यांच्या राजकारणाला उतरती कळा लागलेली असली, तरी ते अजून भंगारात निघालेले नाहीत. शिवाय फ्रान्‍सिस सार्दिन यांच्यासारखे अस्तनीतले निखारे आहेतच. विजय सरदेसाई यांच्या मध्यंतरीच्या पर्रीकरभक्तीमुळे चिडलेला मतदारही याच तालुक्यात आहे आणि तो आपला प्रभाव दाखवेल. अशा परिस्थितीत काँग्रेस- गोवा फॉरवर्डची (Goa Forward) ‘आता झालीय, आता नाही’ अशा अवस्थेतील ऐनवेळच्या युतीचा प्रभाव काय राहील,हा प्रश्न अधिक गहन होतो.तृणमूल काँग्रेसच्या प्रवेशामुळे बदललेल्या परिप्रेक्ष्यांत समविचारी पक्षांकडली युती काँग्रेसची (Congress) निकड झालेली असली, तरी भाजपाविरोधी मतांचे विभाजन टाळण्याचे सामर्थ्य तिच्यात असेल काय, हा प्रश्न आहेच. त्यातच काँग्रेसचे नेते ‘मॅुंह में राम, बगल में छुरी’ थाटाचे धोरण राबवताना दिसतात. यातून नुकसान कुणाचे संभवते?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com