Goa Election: ज्वलंत प्रश्न ठरणार प्रचाराचे मुद्दे

तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत गोवा निवडणुकीची व्यूहरचना
Goa Election: ज्वलंत प्रश्न ठरणार प्रचाराचे मुद्दे
Goa Elections 2022Dainik Gomantak

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Goa Elections 2022) पार्श्‍वभूमीवर तृणमूल काँग्रेसने (TMC) नेत्यांची व कार्यकर्त्यांची बैठक घेत पुढील प्रचाराची रणनिती ठरवली आहे. या बैठकीवेळी राज्यातील पाणी, सुरक्षा तसेच खाण या ज्वलंत प्रश्‍नांचे मुद्दे प्रचारावेळी घेण्याची चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी तसेच हल्लीच प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनीही आपले विचार मांडून काही सूचना केल्या.

Goa Elections 2022
गोवा सरकारचे आश्वासन फोल! मोफत नको पण नियमित पाणी द्या म्हणत स्थानिक संतप्त

राज्यात तृणमूल काँग्रेसने प्रवेश केल्यापासून लोकांमध्ये या पक्षाचे वातावरण केले होते. त्यानंतर पक्षाच्या अध्यक्षा व पश्‍चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांमध्ये सहभागी होऊन वातावरणाचा अंदाज घेतला. त्यांच्या उपस्थितीत अनेक नामांकित व्यक्तींनी प्रवेश घेतला त्यामध्ये आंतरराष्ट्रीय टेनिसपटू लियांडर पेस यांचाही समावेश होता. आज झालेल्या बैठकीत त्यांनी आपले विचार मांडले. मी मूळ गोव्याचा असलो तर कोलकता येथे मोठा झालो. माझ्या खेळात मी देशाचे तसेच गोव्याला नावलौकिक मिळवून दिले. त्यानंतर समाजकार्यात उतरण्याचा निर्णय घेतला. तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणारा तृणमूल काँग्रेस पक्ष असल्याने त्याच्यात काम करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी मत व्यक्त केले.

Goa Elections 2022
जो पक्ष भंडारी समाजाचा मुख्यमंत्री करणार त्यांनाच आमचा पाठिंबा!

मतदारांना भेटी देण्यावर भर

यावेळी तृणमूल काँग्रेस उपाध्यक्ष व गोव्यातील ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो तसेच डेरीक ओब्राईन यांनीही यावेळी उपस्थित नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केली. येत्या काळात पक्षाची प्रचाराची व्यूहरचना याबाबत चर्चा करण्यात आली. गोमंतकियांचे प्रश्‍न व समस्या सोडविण्यास अपयशी ठरलेल्या सरकारविरुद्धचे मुद्दे तसेच तळागाळात जाऊन मतदारांना भेटी देण्यावर भर देण्याबरोबरच अधिकाधिक कार्यकर्ते तयार करण्याचे ठरविण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com