Goa Election: भाजपच्या निवडणूक कार्यालयाचे नितीन गडकरींनी केले उद्घाटन

भाजपच्या राज्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानवडे यांच्याहस्ते करण्यात आले.
Goa Election:  भाजपच्या निवडणूक कार्यालयाचे नितीन गडकरींनी केले उद्घाटन

Nitin Gadkari

Dainik Gomantak 

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणुका होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभा सुरु केल्या आहेत. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राज्यात सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपला पायउतार करण्यासाठी विरोधी पक्षांनी चांगलीचकंबर कसली आहे. यातच गोव्यात नव्याने दाखल झालेल्या तृणमुल पक्षानेदेखील आपली ताकद वाढविण्यासाठी राज्यातील स्थानिक पक्ष असलेल्या महाराष्ट्र वादी गोमन्तक पक्षाबरोबर युती केली आहे. तर दुसरीकडे भाजपने पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईकडे साकडं घातलं आहे.

दरम्यान, भाजपने आपली जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच राज्यातील नेतृत्वासह राष्ट्रीय नेत्यांनी देखील गोव्यात येऊन प्रचारसभा घेत आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) नि आता केंद्रीय मंत्री नितीन (Nitin Gadkari) गडकरी यांनी गोव्यात हजेरी लावली आहे. भाजपच्या राज्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानवडे यांच्याहस्ते करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com