‘सरकार तुमच्या दारी’वर उधळपट्टी: आप
Goa Government faild to run Sarkar tumchya dari schmeDainik Gomantak

‘सरकार तुमच्या दारी’वर उधळपट्टी: आप

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने आयोजित केलेल्या ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाची श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने आयोजित केलेल्या ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाची श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. भाजपने करदात्यांचे पैसे प्रचारासाठी वापरू नयेत. ‘सरकार तुमच्या दारी’ या आऊटरीच कार्यक्रमाच्या इव्हेंट मॅनेजमेंटवर सरकारने 12.43 कोटी रुपये खर्च केल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये उघड झाले आहे, असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगून सरकारने जनतेचा पैशाचा दुरुपयोग टाळावा, अशीही मागणी केली आहे.

वरील कार्यक्रमासाठी 12.43 कोटी खर्च झाल्याची बातमी धक्कादायक आहे. हा घोटाळा आहे. या कार्यक्रमासाठी एवढा खर्च का झाला, असा सवाल म्हांबरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमांमध्ये पूर्ण झालेल्या कामांच्या तपशीलासह श्वेतपत्रिका द्यावी. सहा तासांच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी 31 लाख रुपये खर्च येतो, म्हणजे ताशी पाच लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. हा पैसा भाजपकडून वसूल केला पाहिजे, असेही ते म्‍हणाले.

Goa Government faild to run Sarkar tumchya dari schme
शेतकरीविरोधी कायदे संसदेमध्येही मागे घ्या: गोवा काँग्रेस

‘सरकार तुमच्या दारी’ हा मतदारांना भुरळ घालण्यासाठी भाजपचा निवडणूकपूर्व प्रचार आहे, असे वाल्मिकी नाईक म्हणाले. सावंत सरकार गृहआधार आणि डीडीएसएसवायसारख्या योजनांच्या लाभार्थ्यांना पैसे द्यायला असमर्थ ठरले आहे. सरकारने या उपक्रमावर खर्च केलेला पैसा लक्षात घेतला तर गोवेकरांना रेशन, पाणी, वीज मोफत बेरोजगारी भत्ता आणि टॅक्सीचालकांसाठी डिजिटल मीटर मिळू शकले असते असे अ‍ॅड. अमित पालेकर म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com