गोव्याला गुजरात,बंगाल मॉडेल नाही तर 'गोवा मॉडेल' हवंय: लुईझिन फालेरो

गोव्यासाठी काय चांगले आहे हे गोव्यातील जनतेने ठरवले तरच ते घडणार आहे. गोमंतकीयांना चांगले प्रशासन मिळावे हेच ‘टीएमसी’चे उद्दीष्ट आहे.
गोव्याला गुजरात,बंगाल मॉडेल नाही तर 'गोवा मॉडेल' हवंय: लुईझिन फालेरो
Goa need New Goa model nor Gujrat or Bengal model says TMC vice president Luizinho FaleiroDainik Gomantak

आमदार विकणे आणि मतांचे विभाजन करणे यासारख्या घाऊक व्यवसायातच कॉंग्रेस पक्ष (Goa Congress) गुंतला आहे, असा गंभीर आरोप तृणमूल कॉंग्रेसचे (TMC) उपाध्यक्ष लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी केला आहे.तृणमूलच्यावतीने राज्यसभा निवडणुकीसाठी फॉर्म भरल्यानंतर पहिल्यांदाच फालेरो बोलत होते. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी खाणकाम, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, पर्यावरण यांसारखे मुद्दे तृणमलच्या प्राधान्य यादीत असतील, असे देखील फालेरो यांनी नमूद केले आहे. (Goa need New Goa model nor Gujrat or Bengal model says TMC vice president Luizinho Faleiro)

खाणकामाच्या मुद्द्यावर फालेरो यांनी स्पष्ट केले की, तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) शाश्वत आणि कायदेशीर खाणकामाला समर्थन देईल. कायदेशीर खाणकाम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी ‘टीएमसी’ लढा देणार आहे. फालेरो यांनी निवृत्तीच्या अफवांचे खंडन करताना सांगितले की, गोव्याचे विशिष्ट मुद्दे राष्ट्रीय स्तरावर मांडण्यात येतील. मी निवृत्त झालेलो नाही. गोव्याचे विशिष्ट प्रश्न संसदेत मांडण्यासाठी हे पाऊल उचलले होते.

लुईझिन फालेरो यांनी त्यांना ही संधी दिल्याबद्दल TMC च्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचे आभार मानत ममता बॅनर्जी ह्या तडजोड करणार नाहीत किंवा पोकळ आश्वासनेही देणार नाहीत. गोव्याला गुजरात मॉडेल किंवा बंगाल मॉडेल नको, तर गोव्याचे मॉडेल हवे आहे. गोव्यासाठी काय चांगले आहे हे गोव्यातील जनतेने ठरवले तरच ते घडणार आहे. गोमंतकीयांना चांगले प्रशासन मिळावे हेच ‘टीएमसी’चे उद्दीष्ट आहे.

Goa need New Goa model nor Gujrat or Bengal model says TMC vice president Luizinho Faleiro
भाजप सरकारसह काँगेसने देखील आमचा धसका घेतलाय: आप

टिकलो ‘टीएमसी’त

हळदोणा मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो यांचे बंधू विल्बर टिकलो यांनी आज (गुरुवारी) तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी त्यांना शाल आणि झेंडा देऊन अधिकृत पक्षामध्ये सामावून घेतले. तृणमूल पक्षाची भूमिका स्वच्छ असल्याने तसेच गोव्याच्या हितासाठी आपण या पक्षात सहभागी झाल्याचे विल्बर टिकलो यांनी सांगितले. यावेळी ‘टीएमसी’चे नेते यतीश नाईक आणि मारियो पिंटो उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com