'काँग्रेस फुटिरांना' पक्षात पुन्हा प्रवेश नाही..!
Goa Politics : CongressDainik Gomantak

'काँग्रेस फुटिरांना' पक्षात पुन्हा प्रवेश नाही..!

काँग्रेसचे ८० टक्के उमेदवार नवोदित; डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार घोषणा: गिरीश चोडणकर

पणजी (Panjim): काँग्रेस (Congress) फुटिरांना पुन्हा प्रवेश नाही, याबाबत पक्षश्रेष्ठी ठाम आहेत. उमेदवारीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 70 ते 80 टक्के नवे चेहरे आणि तरुण उमेदवार असतील. (Goa Politics) या नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उमेदवारीची पहिली यादी जाहीर होऊ शकते. काँग्रेस गट समितीकडून उमेदवार निवडीला अधिक महत्त्व दिले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.

Goa Politics : Congress
ही आहे गोव्यातील खरी कुजबूज..!

तृणमूल काँग्रेसकडून भाजपला सत्तेवरून हटविण्याची भाषा केली जाते, पण ते काँग्रेसला मोठ्या प्रमाणात लक्ष्य बनवत आहेत. यापूर्वी काँग्रेसने राज्यातील निवडणूक स्वबळावर लढविण्याचे ठरविले होते. मात्र, राज्यात नवे पक्ष प्रवेश करत असल्याने कॉंग्रेसला परिस्थितीनुसार काहीशी व्यूहरचना बदलावी लागली आहे. प्रदेश निवडणूक समितीची प्रत्येक मतदारसंघवार गट समित्यांची चर्चा होणार आहे. त्यांनी सूचविलेल्या उमेदवाराच्या नावावर प्रदेश छाननी समिती व केंद्रीय निवडणूक समिती अंतिम निर्णय घेईल, असे चोडणकर म्हणाले.

2017 सालच्या निवडणुकीपूर्वी ज्या पक्षांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला तरी त्यांना कमी जागा मिळाल्या. उलट काँग्रेसने कोणताही चेहरा घोषित न करता सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा पाहून लोक मतदान करत नाहीत, तर जनहितासाठी कोणता पक्ष लढा देऊ शकतो, हे ठरवूनच मतदान होते. काँग्रेसला सर्वाधिक आमदाराच्या जागा मिळूनही केंद्र व राजभवनचा गैरवापर करून भाजपने सत्ता हिसकावली, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

Goa Politics : Congress
चर्चिलचा तृणमूल जुगार यशस्वी होणार?

काँग्रेस पक्षाची इतर राजकीय पक्षांशी बोलणी सुरू आहेत, असे काँग्रेसकडून सांगितले जात असले तरी या युतीला पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचा विरोध व दबाव आहे. त्यामुळे युती करण्यात काँग्रेसला स्वारस्य नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व गोवा फॉरवर्डच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तेथील उमेदवार तिकिटासाठी अन्य पक्षांमध्ये उड्या मारत आहेत. काँग्रेस युती करण्यास जितका वेळ घेईल त्याचा इतर राजकीय पक्षांना फायदा होणार आहे, असेही चोडणकर यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस युतीबाबत गंभीर नसल्याने गोवा फॉरवर्डने तृणमूल काँग्रेसकडे मोर्चा वळविला होता. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या गोव्यात आल्यावर गोवा फॉरवर्डचे तिन्ही आमदार आणि पदाधिकारी त्यांना भेटले होते. मात्र, गोवा फॉरवर्ड तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण तो प्रस्ताव मान्य नसल्याने ही बोलणी फिस्कटली आणि पुन्हा गोवा फॉरवर्डचे नेते काँग्रेसकडे वळले.

Goa Politics : Congress
सावित्री, फळदेसाईंची आता तिरकी चाल..!

तृणमूलला सुगीचे दिवस

गोवा फॉरवर्ड - कॉंग्रेस युती मान्य नसल्याने गोवा फॉरवर्डचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी तृणमूल काँग्रेसला जवळ केले. कॉंग्रेसशी युती झाल्यास कांदोळकर यांना स्वत:ला आणि त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार नाही, अशी शंका आल्याने त्यांनी शनिवारी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलचा दिवसेंदिवस वाढणारा प्रभाव व बिगर गोमंतकीय मतदान या पक्षाला जवळ असल्याने इतर पक्षांचे नेते तृणमूल काँग्रेसकडे आकर्षित होत आहे.

कॉंग्रेसकडून पुन्हा तीच चूक

2017 मध्ये सर्वाधिक आमदार असूनही सरकार घडविण्यासाठी लागलेल्या विलंबामुळे विरोधकाची भूमिका बजावण्याची वेळ आली होती. तीच चूक पुन्हा काँग्रेस करत आहे. काँग्रेसने केंद्रातील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करण्यासाठी चर्चा केली. मात्र, ही बोलणी पुढेच सरकली नाही. युतीचा फैसला लवकर न झाल्यास पुढील निर्णय घेण्यास ते मोकळे असतील, असा इशारा ते वारंवार देत आहेत. मात्र, त्यातून काहीच साध्य होत नाही. त्यामुळे आता त्यांनी या महिन्याअखेरपर्यंत काँग्रेसला ‘अल्टीमेटम’ दिला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com