सावित्री, फळदेसाईंची आता तिरकी चाल..!

‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’ या म्‍हणीप्रमाणे पक्षश्रेष्ठी तिसऱ्या माणसाला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात आहेत..
सावित्री, फळदेसाईंची आता तिरकी चाल..!
Goa Politics : सावित्री, फळदेसाईंची आता तिरकी चाल..!Dainik Gomantak

Goa Politics : सांगे मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून सावित्री कवळेकर व सुभाष फळदेसाई यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. ‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’ या म्‍हणीप्रमाणे पक्षश्रेष्ठी तिसऱ्या माणसाला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यानुसार पक्षनेतृत्वाने या मतदारसंघात चाचपणीही सुरू केली आहे.

Goa Politics : सावित्री, फळदेसाईंची आता तिरकी चाल..!
गोव्यातील 'खाणकाम' ज्वलंत राजकारण..!

भाजपची उमेदवारी मागणारे हे दोन्ही उमेदवार काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. या गोष्टीचा सुगावा लागतात दोन्ही संभाव्‍य उमेदवारांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याचे समजते. मात्र मतदारसंघाच्या विकासाच्या नावाने या पक्षातून त्या पक्षात उडी मारणाऱ्या उमेदवारांना सांगे मतदारसंघातील जनता साथ देईल का, अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙

भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस मंगळवारी घाईघाईने गोव्यात येण्यामागे राज्यातील नेत्यांच्या तीन बायकांनी त्यांच्या नाकात आणलेला दम हेच खरे कारण असल्याचे लपून राहत नाही. मायकल लोबो यांच्या पत्नी दलायला, विश्वजित राणे यांच्या दिव्या आणि सर्वात महत्त्वाचे बाबू कवळेकर यांच्या सावित्री या तीनही महिलांनी भाजपच्या नेत्यांना सळोकीपळो करुन सोडले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com