Goa: मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

लोकांनी विशेष मतदार नोंदणी मोहिमेच्या दिवशी जवळच्या संबधित मतदान केंद्रावर जाऊन मतदार नोंदणीचे अर्ज भरून द्यावे.
Election
Election Dainik GomantaK

मुख्य निवडणूक अधिकारी (Election Officer) कार्यालयाने 20 आणि 21 नोव्हेंबर आणि 27 आणि 28 नोव्हेंबर 2021 रोजी म्हणजे शनिवार आणि रविवारी विशेष मोहीम आयोजित केली आहे. या विशेष दिवसांमध्ये BLO सर्व मतदान केंद्रांवर (polling stations) मतदार यादी आणि आवश्यक अर्जांसह सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतील.

सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषत: राजकीय पक्षांना विनंती करण्यात येते की त्यांनी सदर मतदार याद्यांची छाननी करावी आणि नावे समाविष्ट, वगळणे किंवा दुरुस्त करण्यासाठी आवश्यक अर्ज भरून द्यावे. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष मतदार यादी उजळणी कार्यक्रम होणार आहे. राज्यांमध्ये विशेष मोहीम सुरू करून विशेषत: 18-19 वयोगटातील पात्र तरुण मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यात येईल.

Election
गोवा विधानसभा की पांढरा हत्ती?

मसुदा मतदार याद्या 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पासून सर्व तालुक्यातील संबंधित मतदान केंद्र, संबंधित निर्वाचन अधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात छाननीसाठी उपलब्ध असतील.

नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन ई-सेवा (Online e-service) उपलब्ध आहे. लोकांनी विशेष मतदार नोंदणी मोहिमेच्या दिवशी जवळच्या संबधित मतदान केंद्रावर जाऊन मतदार नोंदणीचे अर्ज भरून द्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com