'मी अ‍ॅड. कार्लूस फॅरेरा यांना जिंकून आणण्यासाठी काम करणार': पणजीकर

काँग्रेस पक्षाचे नेते अमरनाथ पणजीकर यांनी अॅड. कार्लूस आल्वारेस फॅरेरा यांना हळदोण मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Amarnath Panajikar
Amarnath PanajikarDainik Gomantak

पणजी : काँग्रेस पक्षाचे नेते अमरनाथ पणजीकर यांनी अॅड. कार्लूस आल्वारेस फॅरेरा यांना हळदोण मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि येथून त्यांना जिंकून आणण्यासाठी आशावादी असल्याचे म्हटले आहे. हळदोणची काँग्रेस तिकिट मिळवण्याच्या स्पर्धेत पणजीकर (Amarnath Panajikar) हे सुद्धा होते. मात्र त्यांनी नव्या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी काँग्रेसचा (Congress) निष्ठावान कार्यकर्ता असून पक्षाने घेतलेल्या निर्णयावर आनंदी आहे. भाजपला (BJP) घरी पाठवण्यासाठी आम्ही काम करत आहोत.

भाजपने राज्याच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांचा निषेध करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी मी आंदोलनातही सहभागी झालो होतो. तिकीट देताना पक्ष माझ्या कामाची दखल घेईल, अशी अपेक्षा होती. पण तिकीट नाकारल्यानंतर पक्ष सोडणाऱ्यांमधला मी नाही. प्रत्येकाला पक्षाची तिकिट मिळू शकत नाही.’’ असे ते म्हणाले.

Amarnath Panajikar
Goa Assembly Election: 'तिकीट द्या, अन्यथा अपक्ष लढू'!

पणजीकर यांनी आपला पूर्ण पाठिंबा अॅड. कार्लूस आल्वारेस फॅरेरा (Carlos Alvarez Ferreira) यांना दिला आहे. "आम्ही हळदोण मतदारसंघातून जिंकू आणि राज्यातील इतर मतदारसंघातूनही जिंकू. ’’ असे ते पुढे म्हणाले.

“लोकांना मदत करायची असेल तर आमदारच व्हायची गरज नाही. पक्षांमध्ये राहूनही आपण लोकांना मदत करू शकतो. काँग्रेसचे सरकार आल्यावर मला लोकांसाठी काम करण्याची संधीही मिळेल.’’ असे पणजीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com