गोव्यात 80 वर्षांवरील 20 टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

11 टक्के दिव्यांग मतदारांनी देखील मतदान केले.
Senior citizen voting
Senior citizen voting Dainik Gomantak

पणजी: विधानसभा निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होत असले तरी यंदा प्रथमच 80 वर्षांवरील जेष्ठ 20 टक्के मतदारांनी आपले मतदान पूर्ण केले असून 11 टक्के दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर आचारसंहिता लागू झाल्यापासून विविध सरकारी खाती, भरारी पथके यांनी आतापर्यंत 11 कोटी 44 लाख 29 हजार 931 रुपयांचा मुद्देमाल आणि रोकड जप्त केली आहे. याची माहिती माहिती निवडणूक आयोगाच्या (Election Commission) वतीने अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी दिली. (Senior citizens in Goa)

Senior citizen voting
एसीजीएल कंपनीच्या स्टोअर विभागाला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

विधानसभा निवडणूक (Assembly Election) प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिक सहभागी होऊन सर्वाधिक मतदान होईल यासाठी यंदा प्रथमच केंद्रीय निवडणूक आयोगाने 80 वर्षांवरील जे मतदार मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकत नाहीत असे ज्येष्ठ नागरिक, याशिवाय दिव्यांग, विशेष मतदारांच्या (Voters) घरी जाऊन मतदान करून घेण्याची सोय केली आहे. किंवा ते पोस्टाच्या साह्याने आपले मतदान करू शकतात. राज्यात 80 वर्षावरील 29 हजार 281 मतदार आहेत. त्यापैकी 25 हजार 636 मतदार पोस्टल बॅलेट पेपर किंवा त्यांच्या घरी मतदान करण्यास पात्र आहेत. यापैकी 20.75 टक्के म्हणजेच 5320 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर राज्यात 9565 दिव्यांग विशेष मतदार आहेत. यापैकी 8459 मतदार पोस्टल बॅलेट पेपर अथवा घरी मतदान करण्यासाठी पात्र आहेत यापैकी 924 मतदारांनी म्हणजेच 11 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Senior citizen voting
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आज गोवा दौऱ्यावर

मतदानासाठी यंत्रणा सज्ज

यंदाच्या मतदानासाठी 1722 मतदान केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्रांवर मतदान अत्यंत सुरळीत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावा यासाठी आयोगाने विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केले असून बहुतांश केंद्राच्या बाहेर मतदारांना रांगा लावण्यासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. याशिवाय या मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, तात्पुरती प्रसाधनगृहे उभारण्यात येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com