Election Campaign: लोबोंच्या उपस्थितीत केदार नाईकांनी फोडला प्रचाराचा नारळ

कॉँग्रेस नेते केदार नाईक यांनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्या या प्रक्रियेमध्ये मायकल लोबो त्यांच्यासोबत आहे.
Election Campaign: लोबोंच्या उपस्थितीत केदार नाईकांनी फोडला प्रचाराचा नारळ
Kedar Naik started the election campaign in the presence of Michael LoboDainik Gomantak

Election Campaign: गोवा विधानसभा निवडणूक आता जाहीर झाली असून सर्वत्र फक्त निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे. आता हळूहळू पक्षांच्या उमेदवार यादी जाहीर होत आहेत. त्यामुळे संगळ्यानाच आता निवडणुकीच्या (Goa Assembly Elections 2022) निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

Kedar Naik started the election campaign in the presence of Michael Lobo
Goa Election: प्रसाद गावकर देणार आज आमदारकीचा राजीनामा

निवडणुकीच्या प्रक्रियेमधील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे निवडणूक प्रचार (Election Campaign). गोव्यात आता अनेक उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यातच आता मायकल लोबो (Michael Lobo) यांनी भाजपला (BJP) रामराम ठोकला आहे. ते आता कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हंटले जात आहे. याचे कारण असे, कॉँग्रेस (Congress) नेते केदार नाईक यांनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्या या प्रक्रियेमध्ये मायकल लोबो त्यांच्यासोबत आहे. लोबोंच्या उपस्थितीत केदार नाईकांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे.

नाईक यांनी गिरी-साळगाव मधून लोबोंसोबत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. कॉँग्रेस प्रक्षाची धोरणे आणि लोकोपयोगी भूमिका ते आपल्या प्रचारादरम्यान जनतेला पटवून देत आहे. त्यामुळे आता लवकरच लोबो देखील कॉँग्रेस प्रवेश करून नाईक यांच्यासोबत प्रचाराला सुरुवात करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.